Mumbai News: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापन करण्याची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण असणार याकडे लागले आहे. अशातच आज मंगळवारी 26 तारखेला विधानसभेची मुदत संपली आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सकाळी राजभवनावर दाखल होत राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तर यावेळी CM शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
विधानसभेची मुदत संपल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे हे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्यानंतर राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
राज्यातील मुख्यमंत्रिपदावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केल्याची माहिती आहे. तसंच मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच रहावं यासाठी शिंदे गटातील नेते आग्रही आहेत. तर यावेळी भाजपकडे मोठं संख्याबळ असून आता फडणवीस यांनी राज्याचं नेतृत्व करावं अशी इच्छा भाजप नेते व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता राज्याच्या नेतृत्वाची धुरा नेमकी कोणाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.