Prakash Ambedkar Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar : युती की आघाडी 'वंचित'चा पाठिंबा कोणाला? निकालाआधीच आंबेडकरांनी भूमिका केली स्पष्ट

Ambedkar clarifies stance before Maharashtra election results: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं आहे. तर उद्या शनिवारी (ता. 23) विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, निकालाआधीच राज्यात आम्हीच सरकार स्थापन करू, असा दावा महाविकास आघाडी आणि महायुतीकडून केला जात आहे.

Jagdish Patil

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं आहे. तर उद्या शनिवारी (ता. 23) विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, निकालाआधीच राज्यात आम्हीच सरकार स्थापन करू, असा दावा महाविकास आघाडी आणि महायुतीकडून केला जात आहे.

तर विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी विविध संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या अंदाजानुसार राज्यात युती किंवा आघाडीला सत्तास्थापनेसाठी अपक्ष तसेच लहान पक्षांची गरज घ्यावी लागणार असल्याचं भाकीत केलं जात आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी टायमिंग साधत ते कोणाला पाठिंबा देणार हे जाहीर केलं आहे.

राज्यात मागील महिन्याभरापासून निवडणुकीचा रणधुमाळी सुरू होती. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रमुख लढत झाली असली तरी आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या तिसऱ्या आघाडीसह मनसे आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका देखील या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

अशातच आता वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. आंबेडकर यांनी एक्सवर एक पोस्ट करत आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, "जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ. आम्ही सत्ता निवडू ! आम्ही सत्तेत राहायला निवडू!"

त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत ते आगामी सरकार कोणाचंही असलं तरी ते सत्तेत असणार याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या निकालाआधी राज्यातील राजकारणात नवीन ट्विस्ट समोर येत असून राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT