Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Exit Poll: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत. बहुतांश एक्झिट पोलने पुन्हा एकदा भाजप महायुतीच (Mahayuti) राज्यात सत्ता स्थापन करू शकते अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
मात्र, आता निवडणुकीच्या मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले असतानाच महाविकास आघाडीचं टेन्शन कमी करणारा आणि महायुतीची धडधड वाढवणारा नवीन एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये बहुमतासाठी लागणारा 145 जागांचा आकडा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पार करु शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्यामुळे आता आघाडीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला 149 जागा तर महायुतीला केवळ 127 जागा मिळण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाविकास आघाडी बहुमतासाठी लागणारा 145 जागांचा आकडा पार करू शकते. त्यामुळे ते राज्यात सत्ता स्थापन करू शकतात.
महाविकास आघाडी - 149 जागा
मराठवाडा - 30
मुंबई - 18
उत्तर महाराष्ट्रात - 23
ठाणे आणि कोकण - 17
विदर्भ - 31
पश्चिम महाराष्ट्र - 30
महायुती - 127 जागा
मराठवाडा -15
मुंबई - 18
उत्तर महाराष्ट्र - 21
ठाणे-कोकण - 18
विदर्भ - 29
पश्चिम महाराष्ट्र - 26
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यात यंदा सरासरी 66.05 टक्के मतदान झाले. मतदानाचा वाढलेला टक्का महायुती की महाविकास आघाडी? कोणाला फायदेशीर ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर प्रजातंत्रच्या एक्झिट पोलमध्ये जरी महाविकास आघाडीला बहुमत मिळणार असं दाखवलं असलं तरी इतर एक्झिट पोलमध्ये महायुतीचं पारडं जड दाखवण्यात आलं आहे.
टुडे चाणक्य सर्व्हेनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येण्याची शक्यता वर्तवली आहे. या पोलनुसार महायुतीला तब्बल 175 जागा तर महाविकास आघाडीला 100 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विविध संस्थांच्या एक्झिट पोलनी आपापला अंदाज वर्तवला असला तरी जनतेचा कौल नेमका कुणाला आहे याबाबतची स्पष्टता शनिवारी संध्याकाळपर्यंत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.