Mahayuti News: Sarkarnama
मुंबई

Mahayuti News: महायुतीची तारीख ठरली; राज्य पिंजून काढणार; 11 घटकपक्षांसह...

Mangesh Mahale

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती अँक्शन मोडवर आली आहे. आगामी लोकसभा एकत्र लढण्याचा निर्धार आज (बुधवारी) झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत महायुतीच्या नेत्यांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित केले.

14 जानेवारीपासून महायुतीकडून जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर तालुकास्तर, बुथस्तरावर बैठका होणार असून त्यानंतर विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहेत. मेळाव्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व घटकपक्षाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापूर्वी हे मेळावे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मोदीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र मोठे यश मिळेल. ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला. सुनील तटकरे, दादा भुसे यांनीही मेळाव्या विषयी माहिती दिली. बावनकुळेंनी यावेळी ठाकरे गट आणि अजित पवार गटाला टोला लगावला. "एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जरी सत्तेत सामील झाले असले तरी देखील भाजप पक्ष सर्वात मोठा आहे. सत्तेत आमचा पक्ष वरचढ आहे," "आमच्या पक्षात सर्वांना यायचं आहे, अन् सगळेच इच्छुक आहेत," असा चिमटा बावनकुळेंनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT