Arvind Kejriwal : तिसऱ्या नोटीशीनंतर तरी केजरीवाल ED चौकशीला आज हजर राहतील का?

Kejriwal to Skip ED Summons: ..तर त्यांना अटक होऊ शकते!
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

Delhi CM News : मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी ED कडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावण्यात आले आहे. याआधीही केजरीवाल यांना ईडीनं दोनवेळा नोटीस बजावली होती, पण ते चौकशीला हजर राहिले नाहीत. तिसऱ्या नोटीशीनंतर तरी केजरीवाल ईडी कार्यालयात जाणार का, की या नोटीशीला ते केराची टोपली दाखवणार हे आज दुपारपर्यंत समजेल.

केजरीवाल ईडीच्या चौकशीला उपस्थित राहतील का? याबाबत काल (मंगळवार) पत्रकार परिषदेत 'आप'ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कायदेशीर बाबींचा विचार करुन ते निर्णय घेतील, असे 'आप'कडून सांगण्यात आले.

केजरीवाल आज ईडीसमोर हजर झाले नाही तर त्यांना अटक होऊ शकते, असे सुत्रांनी सांगितले. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार गुन्ह्यात त्यांच्या सहभाग असल्याचा सबळ पुरावा ईडीकडे असेल तर ईडी आपल्या अधिकारांचा वापर करून त्यांच्या अटकेची मागणी करु शकते.

(देश)

Arvind Kejriwal
Gopichand Padalkar : पडळकरांना ओबीसी समाजाची चिंता; भीतीपोटीच राज्यभरामध्ये मेळावे...

कथित मद्य धोरण परवाना वाटप घोटाळ्याप्रकरणी चौकशी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कथित मद्य घोट्याळ्यामध्ये 'आप'चे नेते व दिल्ली सरकारमधील मंत्री मनीष सिसोदिया यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक होती. ते सध्या कारागृहात आहे.

Arvind Kejriwal
Bharat Gogawle: मर्द असतील तर चमत्कार दाखवा; गोगावलेचं राऊतांना खुलं आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com