MD Drugs Case Sarkarnama
मुंबई

Crime News : मीरा-भाईंदरमध्ये मोठी कारवाई, अमली पदार्थांची विक्री करणारी टोळी जेरबंद; तब्बल 13 कोटींचे एमडी जप्त!

Mira-Bhayandar Drug Case Police : पोलिसांनी छापा टाकल्यानंतर फिरदोस अरबाज कुरेशी या महिलेच्या घरातुन  1 किलो 324 ग्रॅम वजनाचा 2 कोटी 66 लाख 17,280 रुपये किंमतीचा एमडी जप्त करण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

प्रकाश लिमये

Mira-Bhayandar News : मीरा भाईंदर- वसई विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ यांनी धडक कामगिरी करत तब्बल 13 कोटी रुपये किंमतीचा 6 किलो 773 ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करणारी टोळी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मीरा रोड येथील नया नगर परिसरात असलेल्या छेडा आदर्श इमारतीत एमडी या अमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती ४ मे रोजी मिळाली होती. त्याठिकाणी छापा टाकल्यानंतर फिरदोस अरबाज कुरेशी या महिलेच्या घरातुन  1 किलो 324 ग्रॅम वजनाचा 2 कोटी 66 लाख 17,280 रुपये किंमतीचा एमडी जप्त करण्यात आला.  अमली पदार्थ तिचा पती  अरबाज वकील कुरेशी याचा असल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली.

आरोपींच्या चौकशीत पोलिसांना अमली पदार्थ खरेदी विक्री सहभागी असलेल्या  आणखी काही आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी  मोईज जावेद खान (बेहरामबाग, जोगेश्वरी )  अरमान अली कलाम अली राईन,  सुनिल कमल यादव (दोघे ओशीवरा ) मोहमद वसिम युसूफ शेख (शांतीपार्क, मिरारोड)  इरफान अन्वर कुडीया  (राजकोट, गुजरात),  मोहमद अराफत शमसूददीन अन्सारी ( बदलु रंगारी स्ट्रीट, भायखळा ),  खालदा अरफात अन्सारी ( मदनपुरा, भायखळा ) आकाश सत्यराम यादव( न्यु लिंक रोड, जोगेश्वरी)  यांना अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी  एकंदर ६ किलो ७७३ ग्रॅम वजनाचा १३ कोटी ६१ लाख ३८,४८० रुपये किंमतीचा एमडी जप्त केला आहे. त्यापैकी सर्वाधिक एमडी मुंबईतील आग्रीपाडा परिसरातून  जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी एमडी कोणाकडून खरेदी केले व त्याची कोणाकोणाला विक्री केली याचा तपास पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT