Bulldozer Action : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 'लेडी डॉन'चे साम्राज्य उद्ध्वस्त; अवैध मालमत्तेवर फिरवला बुलडोझर

maharashtra crime news : दिघा परिसरात दहशतीच्या जोरावर अमली पदार्थाचे साम्राज्य चालवणाऱ्या शांताबाई करंडेकर टोळीला पोलिसांनी जोरदार झटका दिला आहे. पोलिसांनी 'लेडी डॉन' म्हणून ओळखणाऱ्या शांताबाई करंडेकरचे साम्राज्य उद्ध्वस्त केले आहे.
bulldozer action
bulldozer actionsarkarnama
Published on
Updated on

navi mumbai drug mafia news : दिघा परिसरात गेल्या सात ते आठ वर्षांपासून दहशतीच्या जोरावर अमली पदार्थाचे साम्राज्य चालवणाऱ्या शांताबाई करंडेकर टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी बीमोड केला आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर अमली पदार्थांच्या विक्रीतून उभ्या केलेल्या बेकायदा मालमत्तेवर नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी (ता. २९) धडक कारवाई करीत बुलडोझर फिरवला आहे.

गुन्हेगारी विश्वातून कमावलेल्या पैशातून दिघ्यात उभारलेली दोनमजली इमारत पोलिसांनी जमीनदोस्त केली असून, नवी मुंबईतील ही अशा प्रकारची पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे. शांताबाई करंडेकर आणि तिचे नाईक कुटुंबातील साथीदार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दिघा परिसरात अमली पदार्थांचा धंदा चालवत होते.

मात्र अमली पदार्थविरोधी पथकाने नियोजनबद्धरीत्या या टोळीच्या ओमकार अपार्टमेंटवर नवी मुंबई पोलिसांनी छापा टाकून या टोळीतील संशयितांना अटक केली होती. तसेच मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या टोळीने दिघा परिसरात सात ते आठ वर्षांपासून दहशतीच्या जोरावर अमली पदार्थांचे साम्राज्य उभे केले होते.

bulldozer action
Crime News : फेसबुकवर ‘अनाथ मुलीसोबत लग्न’ची जाहिरात ठरली सापळा! लग्नासाठी पैसे भरले, पण वधूच नाही! रायगडच्या तरुणाची कोल्हापुरात फसवणूक

या टोळीने संघटितपणे अमली पदार्थांची तस्करी केल्याचे तपासात आढळून आले. तसेच या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली होती.

या टोळीची प्रमुख शांताबाई हिने अमली पदार्थ्यांच्या पैशातून दिघा येथे ३२ लाखांचे घर विकत घेऊन त्यावर बेकायदा दोनमजली बांधकाम केले होते. सिडकोने नोटीस बजावूनही ही जागा खाली न केल्याने बुधवारी पोलिसांनी फौजफाट्यासह ही इमारत रिकामी करत बांधकाम उद्ध्वस्त केले.

करंडेकर टोळीची प्रमुख शांताबाई करंडेकर ही आपल्या हस्तकांमार्फत अमली पदार्थांची तस्करी करीत होती. त्यांच्या विक्रीतून तिने बेकायदा मालमत्ता खरेदी केली होती. या टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर या महिलेने बेकायदा उभारलेल्या इमारतींबाबत सिडकोकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर बुधवारी सिडकोच्या मदतीने या बेकायदा इमारतीवर तोडक कारवाई केली.

-राहुल धस, सहाय्यक पोलिस आयुक्त, रबाळे विभाग

bulldozer action
Nashik Crime News : नाशिकच्या 'गजवा ए हिंद' प्रकरणात हलगर्जी ; महिला तपास अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, पोलीस आयुक्तांचा दणका

FAQs :

1. ही कारवाई कुठे करण्यात आली
नवी मुंबईतील दिगा परिसरात ही कारवाई करण्यात आली

2. कोणत्या टोळीवर कारवाई झाली
शांताबाई करंडेकर यांच्या ड्रग्स टोळीवर पोलिसांनी कारवाई केली

3. पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली
बेकायदा पैशातून उभारलेली दोनमजली इमारत बुलडोझरने जमीनदोस्त केली

4. ही कारवाई का महत्त्वाची आहे
नवी मुंबईतील ड्रग माफियावर पहिल्यांदाच इतकी मोठी आणि थेट कारवाई झाली आहे

5. या कारवाईचा पुढील परिणाम काय होऊ शकतो
यामुळे गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल आणि इतर गुन्हेगारांवरही दबाव निर्माण होईल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com