Ajit pawar on Sandeep Deshpande
Ajit pawar on Sandeep Deshpande  Sarkarnama
मुंबई

Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला,अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

MNS Leader Sandeep Deshpande News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी क्रिकेटच्या स्टम्पच्या साहाय्याने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या हल्ल्याचे राजकीय वर्तुळातही तीव्र पडसाद उमटत असून मनसेच्या नेतेमंडळींकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावर आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये असलेल्या एका टोळक्याने देशपांडे यांच्यावर स्टम्पच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील देशपांडेंना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हल्ल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अमेय खोपकर, शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, भाजप आमदार नितेश राणे यांनी रुग्णालयात जात देशपांडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, सर्वसामान्यांचं सरकार असल्यावर असंच होणार आहे अशी प्रतिकिया दिली आहे. मात्र, हल्लेखोरांबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

यावेळी मनसेच्या अमेय खोपकर यांनी या हल्ल्याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच अविनाश जाधव हल्ला करणार्यांना घरात घूसून मारणार असल्याचं सांगितलं आहे. याचवेळी देशपांडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

...तर सामान्य लोकांच्या सुरक्षेचं काय?

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावर भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, गेल्या ९ महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यात आली, आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला, कोल्हापूरातील आमदार यांच्यावर हल्ला आणि आज मनसे नेते संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला झाला. राजकीय लोकंच जर सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT