Sanjay Raut News: संजय राऊत हक्कभंग समितीला उत्तर देणार की...?

संजय राऊत यांनी १ मार्चला ‘विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे' असे विधान केल्यानंतर त्यांच्या हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
Sanjay Raut News:
Sanjay Raut News: Sarkarnama

Sanjay Raut News : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्यावरून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून बुधवारी (1 मार्च 2023) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यानंतर विधानसभा सचिवांकडबव बुधवारी (१ मार्च) संध्याकाळी संजय राऊतांना नोटीस जारी केली होती. या नोटीसीची मुदत आज संध्याकाळी संपत आहे.

संजय राऊतांना विधानसभा सचिवांना लेखी उत्तर द्यावं लागणार आहे, जर त्यांनी हे लेखी उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्यापूर्वी आज साडे 12 वाजता हक्कभंग समितीची बैठक आहे हे प्रकरण आज हक्कभंग समितीकडे सचिव वर्ग केले जाणार असल्याचीही माहिती आहे. राऊतांचे आज लेखी उत्तर न आल्यास हक्कभंग समिती पुढील कारवाईचा निर्णय घेईल. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sanjay Raut News:
Devendra Fadnavis : ''कसब्यातला विजय महाविकास आघाडीचा विजय नाही..!''; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

संजय राऊत यांनी १ मार्चला ‘विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे' असे विधान केल्यानंतर त्यांच्या हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या या विधानाची चौकशी करण्यासाठी एक हक्कभंग समितीही गठित करण्यात आली आहे. विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव आल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी हक्कभंग समिती नेमली जाते.

प्रत्येक सरकार आपल्या कार्यकाळात हक्कभंग समितीतील सदस्यांची नियुक्ती करते. सरकार बदललं की समितीतील सदस्यही बदलतात. महाविकास आघाडी सरकार काळातील समिती बरखास्त झाली असून आता विधीमंडळात शिंदे-फडणवीस यांच्या सरकारकडून नव्या हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. भाजपचे नेते राहुल कुल हे या समितीचे अध्यक्ष असून या समितीत एकूण 15 सदस्य आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com