Maratha Agitation News : मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी आणि मराठा आरक्षणास विरोध दर्शवणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडणाऱ्या मंगेश साबळे यांनी आता एक घोषणा केली आहे. शिवाय, सरकारने जर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण लवकर द्यावं, अशी मागणीही केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंगेश साबळे यांनी म्हटले की, ''तमाम महाराष्ट्राला सांगू इच्छितो की, मी मंगेश साबळे पुढच्या काही दिवसांमध्ये शासनाने टिकणारं आरक्षण द्यावं यासाठी अन्न-पाणी त्याग करून उपोषणास बसत आहे. जोपर्यंत सरकार मराठ्यांना टिकणारं आरक्षण देत नाही तोपर्यंत मी उपोषणास बसणार आहे.''
याचबरोबर सदावर्तेंवर नेमका कशाबद्दल राग होता आणि गाडी फोडण्यामागे नेमकं काय कारण होतं, यावर बोलताना मंगेश साबळेंनी सांगितलं की, ''मराठे माजुरे आहेत असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात, मराठ्यांना आरक्षण मी मिळूच देणार नाही असे म्हणतात, मराठे लाखोंची-करोडोंची सभा घेतात तर ती जत्रा आहे, असं ते म्हणतात आणि आमच्या भावनांना ठेच पोहाेचवतात.
मराठ्यांचा इतिहास, बलिदान तुम्ही विसरलात का? अशाप्रकारे मराठ्यांविषयी बोलणं हे आमच्या भावना दुखावणारं आहे आणि म्हणून कुठंतरी याला चाप लागावा, यासाठी हा जो प्रकार घडला आहे.''
याशिवाय '' मराठा समाज सुरुवातीपासूनच शांततेत आंदोलन करतो आहे. मात्र, आमच्यावर लाठीमार केला जातो. छत्रपतींच्या अनुयायांचं रक्त या मातीत मिळवण्यात येतं. तो राग आम्ही कसा अनावर करावा म्हणून उद्रेक झाला. पुढील काही दिवसांमध्ये मी अन्न-पाणी त्याग करून मराठ्याला टिकणारं आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करणार आहे.'' असंही मंगेश साबळेने सांगितलं.
मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या काही तरुणांनी मुंबईत जाऊन थेट सदावर्ते यांची आलिशान कार फोडली. ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभरात पसरली, पोलिसांनी या तरुणांना अटक केली आणि दुपारी त्यांची जामिनावर सुटकाही झाली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.