मुंबई : शिवसेनेत उभी फूट पाडून मुख्यमंत्रिपद मिळविलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अखेर विधान परिषदेत खाते उघण्यात यश मिळविले आहे. विधान सभेतील तब्बल ४० आमदार पाठीशी असतानाही विधान परिषदेत मात्र शिंदे गटाची पाटी कोरी होती. मात्र, ठाकरे गटाच्या नाराज आमदार मनीषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेची विधान परिषदेत एन्ट्री होणार, हे आता निश्चित झाले आहे. (Manisha Kayande's entry into the Shiv Sena will make Shinde group's entry into Legislative Council)
मनीषा कायंदे (Manish Kayande) या शिवसेनेत (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray) गेल्या काही दिवसांपासून नाराज होत्या. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. विशेषतः वकूब असूनही पक्ष संघटनेत त्यांना डावलेले जात असल्याची त्यांची खंत होती. त्यातून कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात (Eknath Shinde) जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
मनीषा कायंदे या शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार आहेत. शिवसेनेत त्यांना कायम विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याशी स्पर्धा करावी लागली आहे. तसेच, नुकतेच पक्षात दाखल झालेल्या सुषमा अंधारे यांना पक्षाने उपनेतेपद दिले होते. मात्र, गेल्या ११ वर्षांपासून सेनेत असूनही त्यांना मात्र डावलण्यात आल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे.
मनीषा कायंदे या मूळच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. त्यांनी भाजपमध्ये तब्बल २५ ते ३० वर्षे काम केले आहे. मात्र, कायंदे यांनी २०१२ मध्ये भाजपतून शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना पक्षाचे प्रवक्ते आणि त्यानंतर विधान परिषदेची आमदारकी दिली होती. ज्या भाजपत त्यांनी २५ वर्षे काम केले, त्या भाजपने त्यांना आमदारकी दिली नव्हती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अवघ्या ११ वर्षांतच कायंदे यांना विधान परिषदेत पाठविले होते. त्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
विधान परिषदेत मनीषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे शिंदे गटाचा आवाज आता विधान परिषदेतही घुमणार आहे. कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे युतीचे संख्याबळ वाढण्यासही मदत होणार आहे. सभापती निवडीत कायंदे यांचा शिवसेन प्रवेश हा निर्णायक ठरू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.