Rescue teams clear debris after a portion of a three-storey chawl collapsed in Mankhurd during heavy rainfall. The Mankhurd building collapse claimed eight lives, including children. Sarkarnama
मुंबई

Mankhurd Building Collapse : मुंबईत मुसळधार पावसामुळे चाळ कोसळली! घर सोडणार तोच होत्याचं नव्हतं झालं; 6 जणांचा जागीच मृत्यू

Mankhurd Building Collapse, 8 Dead : मुंबईतील मानखुर्दमध्ये अत्यंत भयानक आणि दु:खद दुर्घटना आहे. मानखुर्द भागातील एका तीन मजली चाळीचा भाग मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Mumbai Rain : मागील चार दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या तर काही ठिकाणी घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

मात्र, आता मुंबईतील मानखुर्दमध्ये अत्यंत भयानक आणि दु:खद दुर्घटना आहे. मानखुर्द भागातील एका तीन मजली चाळीचा भाग मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही चाळ धोकादायक असल्याने पावसाचा जोर वाढल्यानंतर घरातील सामान आवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकं आपापलं सामान आवरत असतानाच अचानक घर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. चाळीचा भाग कोसळताच मलब्याखाली अडकून लहान मुलं आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर आणखी काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे मानखुर्द परिसरात शोककळा पसरली आहे. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासनाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी तात्काळ मदतकार्य सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द मधील ज्या चाळीचा भाग कोसळला आहे. ती धोकादायक असल्याने खाली करण्याची नोटीस महापालिका प्रशासनाने आधीच पाठवली होती.

त्यानंतर इथे राहणारी कुटुंब दुसरीकडे जाण्यासाठी रविवारी दुपारपासून तयारी करत होते. मात्र, अशातच रात्री साडे आठच्या सुमारास अचानक या कुटुंबांवर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच लहान मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती असून शेजारच्या घरातील एका मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT