Lohagad Fort : लोहगड किल्ल्यावर 'सिया पॉइंट'ची क्रेझ, बदनामी थांबवा म्हणत कुणी घेतली CM फडणवीसांकडे धाव?

Lohagad Fort, Siya Point : बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल यांची लोहगडावर हत्या झाली. होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा साथीदार चेतन चौधरी यांनी केतन यांना दरीत ढकलल्याचा आरोप आहे. घटनेचा तपास सुरु आहे.
Lohagad Fort
Lohagad FortSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra latest news : लोहगड हा पुणे जिल्ह्यात लोणावळ्या जवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. पावसाळ्यामध्ये इतरवेळी लोहगडाची चर्चा पर्यटकांच्या गर्दीमुळे होते. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात साहसी पर्यटक केवळ 'सिया पॉइंट' पहायचे म्हणून लोहगडावर येत आहेत. लोहगडाची अशा घटनेमुळे बदनामी होत असल्याची भावना अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने व्यक्त केली आहे.

'सिया पॉइंट' हे नाव इंटरनेटवर लोकेशन म्हणून प्रसिद्धी मिळवत आहे. यामुळे लोहगडासारख्या ऐतिहासिक किल्ल्याची आणि जागतिक वारसा स्थळाची बदनामी होत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली आहे. महासंघाने मुख्यमंत्र्यांना त्यासाठी पत्र लिहलं आहे.

बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल यांची १८ जून रोजी लोहगडावर हत्या झाली. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा साथीदार चेतन चौधरी यांनीच केतनला दरीत ढकलल्याचा संशय व्यक्त होत असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. संपूर्ण देशात या प्रकरणाची चर्चा आहे. याच घटनेमुळे लोहगड किल्ल्यावर ‘सिया पॉइंट’ची क्रेझ निर्माण झाली आहे.

Lohagad Fort
Ketan Agarwal: सियाचे वडील ICUमध्ये; आई म्हणाली, ‘तिलाही लोहगडावरून ढकलून द्या’! चेतन चौधरीचा कर्मचारी बनणार माफीचा साक्षीदार?

सोशल मीडियावर, जेथून केतन अग्रवाल याला दरीत ढकल्यात आले त्या पॉइंटला 'सिया पॉइंट' असं संबोधलं जात आहे. लोहगडावरील झालेला प्रकार दुर्देवी असतानाही सोशल मीडियावर वेगवेगळा मजकूर येत असल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात महासंघाने निवेदनातून आपली भूमिका मांडली आहे.

लोहगडावरील घटनेमध्ये दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. मात्र या घटनेनंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोहगडाची बदनामी सुरू झाली असून ही ऐतिहासिक महाराष्ट्राच्या वारशासाठी धोक्याची घंटा आहे असे गिर्यारोहण महासंघाने म्हटले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र लिहिण्यात आले आहे.

Lohagad Fort
Lohagad Murder Case : इच्छा नसताना सियाला बालीला पाठवण्यासाठी भावाची जबरदस्ती अन् रस्त्यातच प्लॅन फिस्कटला; ड्रायव्हरने केला धक्कादायक खुलासा

लोहगड हे केवळ पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा तो साक्षीदार असून लाखो शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहकांसाठी हा गड श्रद्धेचे स्थान आहे. अशा गडाची ओळख एखाद्या गुन्हेगारी घटनेशी जोडणे, त्या ठिकाणाला नवीन नाव देणे किंवा त्यावर विनोद, मीम्स, रील्स आणि सनसनाटी स्वरूपातील मजकूर प्रसारित करणे, हा आपल्या इतिहासाचा आणि समाजाच्या भावनांचा अवमान आहे.

महासंघाने लोहगडावर घडलेली घटना दुर्दैवी व वेदनादायी असल्याचं म्हटलं आहे. मात्र, अशा गुन्हेगारी घटनेला पर्यटनाचे किंवा आकर्षणाचे स्वरूप प्राप्त होणे हे खेदजनक आहे. अशा प्रकारामुळे 'भविष्यात इतर ऐतिहासिक वारसा स्थळांच्याही संदर्भात अशाच प्रवृत्ती वाढण्याची भीती महासंघाने व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com