Manoj Jarange gave 20 assurances before heading to Azad Maidan; police secured a written undertaking for peaceful protest. Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर जाण्याआधी दिली हमी; 'या' 20 आश्वासनांवर पोलिसांनी घेतली सही...

Manoj Jarange’s 20 Assurances Before Azad Maidan Protest : पोलिसांनी आंदोलनासाठी अनेक अटी घातल्या असल्या तरी केवळ एकाच दिवसासाठी आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. त्यावरून जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Rajanand More

Police Took Written Undertaking from Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवारपासून मुंबईतील आझादा मैदानावर उपोषणाला सुरूवात करणार आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांनी अनेक अटी-शर्थी घातल्या आहेत. त्यानुसार त्यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता जरांगे पाटील यांच्याकडून पोलिसांनी हमीपत्र लिहून घेतले आहे. त्यामुळे जरांगेंनी पोलिसांनी 20 आश्वासने दिली आहेत.

पोलिसांनी आंदोलनासाठी अनेक अटी घातल्या असल्या तरी केवळ एकाच दिवसासाठी आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. त्यावरून जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आंदोलनाच्या वेळेवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. आंदोलकांच्या संख्येची अट त्यांनी मान्य केली आहे. तसेच इतर अटींचे व कायद्याचे पालन करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी दिलीत ही आश्वासने -

  1. आंदोलनाच्या परवानगीची मूळ प्रत सोबत असेल.

  2. पोलिसांच्या नियमित संपर्कासाठी पांडुरंग मारक या जबाबदारी व्यक्तीची प्रतिनियुक्ती करेल.

  3. स्थानिक स्वराज्य संस्थांशी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय मदत याची आंदोलनाच्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था केली जाईल.

  4. वाहतुकीला अडथळा आणणार नाही. वाहनतळाचा वापर आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करू.

5. आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची मर्यादा मर्यादित ठेवेन आणि त्यात वाढ होणार नाही.

6. आंदोलनाच्या ठिकाणी पुरेसे स्वयंसेवक तैनात करू. त्यांची यादी पोलिसांना दिली जाईल.

7. आंदोलन ठरलेल्या ठिकाणीच होईल.

8. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत आंदोलन होईल, याची खात्री मी व इतर आयोजक घेतील.

9. फलक, ध्वजांसाठी २ फुटांपेक्षा अधिक लांबीची काठी वापरणार नाही. फलकांचा आकार ६ फूट किंवा त्यापेक्षा कमी असेल. सहभागी व्यक्ती ध्वज किंवा फलक हे केवळ आंदोलनाच्या हेतूनेच जवळ ठेवतील.

10. आंदोलनात सहभागी व्यक्ती लाठ्या, अग्निशस्त्रे, भाले, तलवारी आणि इतर वस्तू जवळ बाळगमार नाहीत, याची मी व इतर आयोजक खात्री करतील.

11. कोणतीही व्यक्ती चिथावणीखोर भाषणे किंवा विविध गटांमध्ये धर्म, वंश, स्थान किंवा जन्म, निवास, भाषा आदी कारणावरून शत्रुत्व निर्माण करणारी किंवा तसा संभव असणारी भाषा वापरणार नाहीत.

12. आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्ती पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर निर्देशांचे तात्काळ पालन करतील.

13. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, त्यांच्या कर्तव्यात अडथळा, जाळपोळ आदी कोणतीही कृती सहभागी व्यक्ती करणार नाहीत.

14. कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीचा अपमान होईल, या उद्देशाने कोणतेही धार्मिकस्थळ किंवा व्यक्तीच्या कोणत्याही वर्गाने पवित्र मानलेली कोणतीही वस्तू नष्ट करणार नाही किंवा अपवित्र करणार नाही.

15. आंदोलनाच्या ठिकाणावरून कूच करण्याच्या अविर्भावात जाणार नाही. पोलिसांच्या सूचनांचे पालन करू.

16. कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, पुस्तके आणि प्रतिमा जाळणार नाही. अन्न शिजवण्यास, कचरा करण्यास प्रोत्साहन देणार नाही.

17. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करणार नाही. परवानगीनंतर सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेतच वापर केला जाईल.

18. वाहने किंवा कोणतेही पक्षी-प्राणी आंदोलनाच्या ठिकाणी आणली जाणार नाहीत.

19. अनुयायांना नियंत्रणाखाली ठेवण्यास मी जबाबदार असेल आणि त्यात निष्फळ ठरल्यास माझ्यासह इतर आयोजकांवर खटला दाखल करावा.

20. हमीपत्रातील मागदर्शक तत्वांचे पालन आणि पोलिसांना सहकार्य करू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT