Pune Traffic News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; नऱ्हे ते देहूरोड महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी गडकरींचा 6 हजार कोटींचा 'मेगाप्लॅन'

Nitin Gadkari Approves Elevated Corridor in Pune : अंदाजे सहा हजार कोटी रुपयांच्या नऱ्हे ते देहूरोड दरम्यानच्या एलिव्हेटेड कॉरीडॉरला केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूरी दिली असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली.
Union Minister Nitin Gadkari approves ₹6000 crore elevated corridor between Narhe and Dehu Road, announced by MP Supriya Sule.
Union Minister Nitin Gadkari approves ₹6000 crore elevated corridor between Narhe and Dehu Road, announced by MP Supriya Sule.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरालगतची वाहतूककोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगड रोड, नऱ्हे, आंबेगाव परिसरातून अनेक जण हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये कामानिमित्त जातात. या नागरिकांना तासन् तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावं लागत आहे. तसेच पुण्याहून मुंबईला निघालेल्या नागरिकांना देखील या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो. त्यांना आता दिलासा मिळणार आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने सहा हजार कोटी रुपये खर्चून एक मोठा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मंजुरी मिळाली असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक जलद होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अंदाजे सहा हजार कोटी रुपयांच्या नऱ्हे ते देहूरोड दरम्यानच्या एलिव्हेटेड कॉरीडॉरला केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूरी दिली आहे.

Union Minister Nitin Gadkari approves ₹6000 crore elevated corridor between Narhe and Dehu Road, announced by MP Supriya Sule.
Top 10 News : जरांगेंची 'ती' मागणी निरर्थक, समितीचे मत... आंदोलकाचा मृत्यू... शिंदे, अजितदादांच्या इच्छुकांची झोप उडाली! वाचा महत्वाच्या घडामोडी....

आता हा प्रकल्प लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. शहराच्या परिसरातून जाणारी नऱ्हे - नवले पूल ते वारजे आणि चांदनी चौक ते रावेत दरम्यानची पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक जलद व वाहतूककोंडीमुक्त होण्याच्या दृष्टीने या रस्त्याची नितांत आवश्यकता आहे, असे खासदार सुळे यांनी सांगितले.

Union Minister Nitin Gadkari approves ₹6000 crore elevated corridor between Narhe and Dehu Road, announced by MP Supriya Sule.
Manoj Jarange Patil Protest : मोठी बातमी : मनोज जरांगेंसोबत निघालेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू; जुन्नरमध्ये दुर्दैवी घटना...

हा प्रकल्प दोन टप्प्यात होणे प्रस्तावित असून पहिला टप्पा देहू रोड-पाषाण-सूस तर दुसरा टप्पा पाषाण-सूस-नऱ्हे असा असणार आहे. या अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्पास मंजूरी दिल्याबद्दल खासदार सुळे यांनी नितीन गडकरींचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे हडपसर ते यवत या मार्गावर देखील होणाऱ्या एलिव्हेटेड कॉरीडॉर उभारण्याबाबतच्या कामालाही गती द्यावी, जेणेकरून या भागातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com