eaknath shinde manoj jarange Sarakarnama
मुंबई

Manoj Jarange Mumbai Morcha : मनोज जरांगे-पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच तोडगा! एकनाथ शिंदे...

Roshan More

Mumbai : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी 20 जानेवारीपर्यंतची वेळ सरकारला दिली होती. जरांगे-पाटलांची पदयात्रा आज (शनिवारी) अंतरवाली सराटीहून मुंबईकडे रवाना होणार आहे. मात्र, मनोज जरांगे-पाटील मुंबईला पोहोचण्याआधीच या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच बैठक बोलावली आहे.

ही बैठक ऑनलाइन असणार आहे. या बैठकीमध्ये मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यावर विचार केला जाणार आहे. 'सगे-सोयरे' शब्दावरदेखील तोडगा काढला जाणार आहे. कुणबी नोंदी आढळलेल्या सर्वांना सरसकट आरक्षण (reservation) द्या, या जरांगे-पाटील यांच्या मागणीवरदेखील या बैठकीत चर्चा होईल.

जरांगे-पाटलांची यापूर्वीच बच्चू कडू यांनी भेट घेतली होती. या भेटीतून मनोज जरांगे यांनी पदयात्रा काढू नये, असे प्रयत्न केले जात होते. मात्र, त्याला यश मिळाले नाही. मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत.

मंगळवारी बच्चू कडू यांनी सगे-सोयरे या शब्दाचा मसुदा घेऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. ज्यात काही बदल जरांगेंनी सुचवले. त्यामुळे सुधारित मसुदा घेऊन बच्चू कडू पुन्हा एकदा जरांगे-पाटील यांना भेटणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुलाल उधळणार की आंदोलन?

मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला 20 तारखेपर्यंतची मुदत दिली होती, मात्र ती वेळ आता संपली आहे. मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईला यायला लागणार नाही, अशी ग्वाही मराठा समन्वय समितीमधील नेत्यांनी दिली होती. परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही आणि आज ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, यावर मनोज जरांगे-पाटील गुलाल उधाळणार की आंदोलन करणार, हे स्पष्ट होणार आहे.

(Edited By Roshan More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT