Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे पदयात्रा निघणार आहे. पदयात्रा निघण्याच्या आधी बोलताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले. त्यांचा कंठ दाटून आला. डोळे पाणवले. मुंबईत जाऊन उपोषण करण्यापेक्षा अंतरवाली सराटीमधूनच आपण बेमुदत उपोषण करत असल्याचे जाहीर केले.
मी असेल नसेल मात्र मराठ्यांना आरक्षण ( Reservation) मिळायला हवे. माझ्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी तरुणांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या आठवणीने आपण भावूक होतो. मी कणखर पण भावनिक क्षण आला तर खचतो, असे भावूक होऊन मनोज जरांगे पाटील (Manoj jarange ) म्हणाले.
ही शेवटची लढाई आहे. घरात राहू नका, असे आव्हान जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले. मुंबईत तीन कोटी मराठा बांधव येणार आहेत. या पेक्षा जास्त लोक मुंबईत जमली असती. मात्र, मुंबईत आलेल्या मराठ्यांच्या मदतीसाठी काही लोकांना मागे राहवे, असे ठरले आहे. आम्ही किती लोक जमवत आहोत हे कोणाला दाखवायचे नाही. आरक्षण मिळवणे हाच आमचा उद्देश आहे, असे जरांगे यांनी ठासून सांगितले.
मनोज जरांगे यांची पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघणार असल्याने सरकारने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. तब्बल 1100 पोलिस कर्मचारी आणि 100 पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे.
मराठा आरक्षणासाठी एका मुलाने आत्महत्या केली. त्या मुलाचा बाप फक्त मला सांगयला आला की माझ्या मुलाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. तो एकुलता एक होता. त्या बापाला काय वाटले असेल. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या पत्नींना मकर संक्रातीच्या दिवशी काय वाटले असेल, असे म्हणत असे म्हणत जरांगेना अश्रू अनावर झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.