BJP Politics : मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आपले आंदोलन गुरुवार (ता.29) पासून सुरू केले आहे. दरम्यान, मुंबईत आंदोलनाच्या ऐवजी न्यायालयाने त्यांना खारघरमधील जागेचा पर्याय दावा, असे सूचवले होते. मात्र, मनोज जरांगेंना सरकारने मुंबईत येण्याच्या आणि आंदोलन करण्याची देखील परवानगी दिल्याने भाजपमधील ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना वाशीमध्येच मनोज जरांगेंना थांबवून त्यांचे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यावेळी सगेसोयरेचा जीआर देखील काढला होता. सरकारला आता न्यायालयाच्या आदेशानुसार मराठा आंदोलकांना मुंबईबाहेर थांबवता आले असते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने त्यांना मुंबईत येण्याची आंदोलन करण्याची परवानगी दिली. त्यामुळे भाजपमधील नेते देखील खासगीत आश्चर्य व्यक्त करत आहेत.
मराठा आंदोलनामुळे ओबीसी भाजपच्या बाजुने एकवटतो असे चित्र आहे. त्याचा भाजपला राजकीय फायदा देखील होतो. मात्र, सर्व पक्षातील आमदार खासदार हे मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना पाठींबा देत आहे. भाजप आमदार खासदार त्याला अपवाद आहेत. एक दोन नेते, आमदार वगळता जाहीर कोणी जरांगेंच्या बाजुने बोलत नाही. त्यामुळे भाजपमधील मराठा नेत्यांना त्याचा राजकीय फटका बसण्याची देखील भीती वाटत असल्याचे सांगितले जात आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. सरकार या आंदोलनाला कसे हातळणार असा प्रश्न असताना आता ओबीसी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. ओबीसी संघटनांकडून मुंबईला मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी या मराठा आंदोलन आणि मनोज जरांगेंना शरद पवार, उद्धव ठाकरेंची चिथावणी असल्याचा आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.