थोडक्यात बातमी:
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाचं आवाहन केलं आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा आरक्षणावरील कॅबिनेट उपसमितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
नव्या उपसमितीत 11 मंत्री असून, ही समिती मराठा आरक्षणासंबंधी कायदेविषयक व प्रशासकीय कामकाज, तसेच आंदोलकांशी संवाद साधणार आहे.
Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई छेडली आहे. यासाठी त्यांनी येत्या 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जरांगेंच्या या आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं 29 ऑगस्टला मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई महापालिका,पोलीस प्रशासन यांच्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. याच आंदोलनाचा धसका घेत सरकारनं धावाधाव सुरू केली आहे. यातच आता फडणवीस सरकारनं( Devendra Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शुक्रवारी (ता.22) तातडीनं बैठक बोलावली.या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते उपस्थित होते.या बैठकीत मराठा आरक्षणाविषयक विशेष उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चंद्रकांत पाटील यांच्याजागी उपसमितीच्या अध्यक्षपदी विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे विखे नवे अध्यक्ष असणार आहे. यापूर्वी, एकनाथ शिंदे सरकारच्या काळात,तत्कालीन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे 4 ऑक्टोबर 2022 रोजी स्थापन झालेल्या मराठा आरक्षणविषयक (Maratha Reservation) राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष होते. पाटील यांच्या जागी आता विखे-पाटील यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाची सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि इतर विषयांवर शिफारसी करण्यासाठी कॅबिनेट उपसमितीची पुनर्रचना केली आहे.या कॅबिनेट उपसमितीत एकूण 11 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. या उपसमितीकडे मराठा आरक्षणासाठी प्रशासकीय आणि कायदेविषयक कामांचा समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच,ही मंत्रिमंडळ उपसमिती मराठा आंदोलक आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचं कामही पार पाडणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती ठरवण्याचा अधिकारही या उपसमितीला देण्यात आले आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला लाखोंच्या संख्येने येण्याचं आवाहन केलं आहे.याच पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या मोर्चाच्या काळात मुंबईत गणेशोत्सव असणार आहे.त्यामुळे या मोर्चावर तोडगा निघतो का?यासाठी सरकारची चाचपणी सुरु आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागले होते. या बैठकीला अनेक मराठा नेतेही उपस्थित होते अशी माहिती समोर येत आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे, राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव (पाटील), राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
Q1. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी कोणती तारीख जाहीर केली आहे?
➡️ 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे.
Q2. मराठा आरक्षणावरील उपसमितीच्या अध्यक्षपदी कोणांची नियुक्ती झाली?
➡️ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
Q3. या नव्या कॅबिनेट उपसमितीत किती मंत्र्यांचा समावेश आहे?
➡️ एकूण 11 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
Q4. उपसमितीची मुख्य जबाबदारी काय असेल?
➡️ मराठा आरक्षणासाठी प्रशासकीय, कायदेविषयक कामांचा समन्वय साधणे व आंदोलकांशी चर्चा करणे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.