Prakash Ambedkar and Manoj Jarange Patil  Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar : जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Prakash Ambedkar and Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे.

Ganesh Thombare

Mumbai News: "मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून लोकसभा लढवावी, जर जरांगे पाटलांनी निवडणूक लढवली तर त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असेल. जरांगे पाटील जर लोकसभेत गेले तर त्यांना आरक्षणाचा मुद्दा संसदेत व्यवस्थितपणे मांडता येईल, ते जालन्यातून निवडून देखील येतील", असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. आंबेडकर आज माध्यमांशी बोलत होते. (Prakash Ambedkar and Manoj Jarange Patil )

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने 'सगेसोयरे'बाबत जी अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, यामागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी अन्न,पाणी घेण्यास नकार दिला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे-पाटील यांच्या उपोषणाबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकार जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच आम्ही जरांगे पाटील यांना निरोप पाठवला असून त्यांनी शरीराला त्रास देऊन हा लढा उभा करण्याचा उपयोग नाही. आम्ही पाठिंब्याबाबत‌ त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, त्यातून हा प्रश्न मार्गी लावावा. जरांगे पाटील लोकसभेत गेले तर त्यांना आरक्षणाचा मुद्दा मांडता येईल. सध्या फसवं आरक्षण सुरुय असं वाटतं, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.

उपोषणाचा पाचवा दिवस...

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला आज पाचवा दिवस असून त्यांची तब्येत खालावली असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. पण तरी देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. 'सगेसोयरे' ही मागणी मान्य करण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT