Manoj Jarange Patil on Ladki Bahin Yojana Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange: Video लाडक्या भाच्याच्या आरक्षणाचं, दाजींच्या शेतमालाचं काय? जरांगेंची सरकारला विचारणा

सरकारनामा ब्यूरो

सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारची लोकप्रिय 'लाडकी बहीण'योजनेला (Ladki Bahin Yojana) मिळत असलेल्या प्रतिसादाचा विरोधकांनी धसका घेतला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 'लाडकी बहीण'चे कौतुक करीत असताना सरकारला टोला लगावला आहे.

लाडक्या बहिणींंना पैसे देतात, मग लाडक्या भाच्याच्या आरक्षणाचं, दाजींच्या शेतमालाच्या भावाचं काय? असा सवाल जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. 'लाडकी बहीण' योजना चांगली आहे, त्यासाठी सगळ्यांनी अर्ज भरा, असे आवाहन त्यांनी केले.

लाडक्या भाच्याचा आयुष्यांचा विचार सरकारने केला नाही. दीड हजार, तीन हजारांवर आमचं आयुष्य जाणार नाही, बहिणीला तीन हजार दिले, पण दाजी शेतात काम करतो, त्याचं काय करायचं, अशी विचारणा जरांगेंनी सरकारला केली आहे.

जरांगेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना लक्ष्य केले आहे. फडणवीसांनी आपले वावर विकून लाडक्या बहिणीला पेसै दिले नाही, अशा शब्दात जरांगेंनी फडणवीसांना चिमटा घेतला.

मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करीत आहेत. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यांची ही मागणी राज्य सरकारने अद्याप मान्य केलेली नाही. त्यामुळे ते आणखीच आक्रमक झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मनोज जरांगे यांनी उगाच टार्गेट करू नये, असे आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे. राज्यात 6 प्रमुख पक्ष असून त्यापैकी 3 पक्ष सध्या सत्तेत आहेत. तर 3 विरोधी बाकावर बसले असून तुम्ही त्यांनाही आरक्षणावर भूमिका मांडायला सांगा, असा सल्ला राऊतांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT