Goa Politics: राहुल गांधींची भारत 'तोडो' यात्रा गोव्यात का आली नाही? भाजप नेत्याने सांगितलं कारण

Giriraj Pai Vernekar on Rahul Gandhi Bharat Jodo Yatra :गोव्याविषयी राहुल गांधी कोणतेही प्रेम नाही. गोवा त्यांनी स्थानिक नेत्यांवर सोडून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह यांच्यासाठी गोवा महत्वाचा आहे.
Giriraj Pai Vernekar
Giriraj Pai VernekarSarkarnama
Published on
Updated on

Panaji: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आपला गोवा दौरा ऐनवेळी रद्द केला आहे. यावरुन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी चोडणकर यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

कॉंग्रेसचे स्थानिक नेतृत्व बौद्धिक दिवाळखोर व भ्रष्ट असल्यानेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी गोवा भेटीवर आले नाहीत का, अशी विचारणा गिरीराज पै वेर्णेकर यांनी कॉंग्रेसचे गिरीश चोडणकर यांना केली आहे. याच कारणास्तव गांधी यांची भारत जोडो (तोडो) यात्रा गोव्यात आली नाही आणि गांधी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी गोव्यात आले नव्हते का, असेही प्रश्‍न वेर्णेकर यांनी उपस्थित केले आहेत.

राज्यातील भाजप सरकारवरील भष्ट्राचाराचे आरोप वाढले आहेत. त्याचमुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्यात येण्याचे टाळले, असा टोला चोडणकर यांनी सोमवारी लगावला होता. नड्डा हे भाजप नव्या कार्यालय इमारत कोनशिला बसवण्‍यासाठी येणार होते, मात्र गाभा समिती बैठक आणि केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला होता. चोडणकर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना वेर्णेकर यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

Giriraj Pai Vernekar
Shivaji Maharaj Statue: Video दीपक केसरकरांनी तोडले अकलेचे तारे; पुतळा कोसळला...ही एक संधी

राहुल यांचे गोवा प्रेम हे निसर्ग सौंदर्य आणि विशिष्ट जातीच्या कुत्र्यांपुरतेच मर्यादीत आहे. त्यांना गोव्याविषयी कोणतेही प्रेम नाही आणि गोवा त्यांनी स्थानिक नेत्यांवर सोडून दिला आहे. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी गोवा महत्वाचा आहे. त्यासाठी ते गोव्याला भेटीही देतात आणि विविध माध्यमांतून संवादही साधतात.

प्रश्‍न सोडवण्यावर भर द्या!

चोडणकर यांनी जनतेने कॉंग्रेसला २०१२ पासून सत्तेपासून का वंचित ठेवले आहे, याचा विचार करावा, असा सल्ला देऊन वेर्णेकर यांनी म्हटले, की चोडणकर यांनी भाजपवर तोंडसुख घेण्यात शक्ती खर्च घालण्यापेक्षा कॉंग्रेसच्या अंतर्गत कारभारावर लक्ष द्यावे. पुढील प्रदेशाध्यक्ष व पुढील विरोधी पक्षनेतेपदासाठी स्पर्धा आहे. ते प्रश्‍न सोडवण्यावर त्यांनी अधिक भर द्यावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com