Raj Thackeray, Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवताच जरांगे संतापले, म्हणाले "स्वत:चं पोरगं पाडलं, किती दिवस भाजपची..."

Raj Thackeray on Maratha Protest : : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा (ता.31) दिवस आहे. काल शिंदे समितीने जरांगे यांची भेट घेतली. मात्र, तरीही अद्याप आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे हळूहळू मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमा होत आहे.

Jagdish Patil

Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा (ता.31) दिवस आहे. काल शिंदे समितीने जरांगे यांची भेट घेतली. मात्र, तरीही अद्याप आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे हळूहळू मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमा होत आहे.

अशातच आता जरांगे यांच्या आंदोलनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. आंदोलनावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टार्गेट न करता एकट्या एकनाथ शिंदेंना कारणीभूत ठरवल्याचं पाहायला मिळालं.

राज ठाकरे म्हणाले, "मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं केवळ एकनाथ शिंदेच देऊ शकतात. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. यावर एकच उत्तर आहे की एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना? मग आता त्यांना विचारा हे परत का आलेत?"

तर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवताच मनोज जरांगे पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, त्या भाजपची री कधीपर्यंत री ओढणार आहात? असा सवाल जरांगेंनी राज यांना विचारला आहे.

तुम्हाला आम्ही काही विचारलं का? मग तुम्ही आम्हाला सल्ला का देताय. तुम्ही भाजपकडे गेलात, आता पाठिंबा काढून घेतला. आम्ही 11 आमदार दिलेत तेव्हा आम्ही म्हटलं की मराठवाड्यात कशाला येता? मग तुम्ही आम्हाला कशाला विचारता?

स्वतः ठाकरे ब्रँडचं अस्तित्व खराब करून घेत आहात. स्वतःचं पोरगं निवडणुकीत पडलं. तुम्ही हुशार राजकारणी, डोक्याने वागलं पाहिजे, नाहीतर फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील. तुम्हाला वाटतं तुम्ही फार हुशार पण गरीब मराठ्यांना सगळं कळतं, असं जरांगे म्हणाले.

तसंच निवडणुका जवळ आल्या की तुम्हाला जवळ धरतात आणि मतदान मिळालं की दूर करतात. आता नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात ठाकरे बंधुनी एकत्र कार्यक्रम घेतल्यामुळे ते भयभीत झालेत. पुन्हा मुख्यमंत्री जवळ येत तुमच्या घरी जेवलेत म्हणजे तुम्ही खुश झाला. मात्र त्यामुळे गेला तुमचा पक्ष खड्ड्यात, असा टोलाही जरांगेंनी यावेळी राज ठाकरेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT