Manoj Jarange reaction to Vikhe Patil controversy Sarkarnama
मुंबई

Maratha Andolan : विखेंच्या बंगल्यावर मराठ्यांचा ठिय्या! जरांगे अन् मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप

Vikhe Patil bungalow protest by Maratha activists: आंदोलकांच्या गराड्यात मंत्री राधाकृष्ण विखे यांचा गोंधळ उडालेला व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

Amit Ujagare

Maratha Andolan Maharashtra updates: मराठा उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे यांच्या शासकीय निवासस्थानी आज सकाळी मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं यावेळी आंदोलकांच्या गराड्यात त्यांची चांगलीच त्रेधातिरपट झाल्याचं समोर आलेल्या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.

शासनानं मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मराठा समाज अशी दोघांची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी या आंदोलकांनी केला. रमेश केरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील राधाकृष्ण विखे यांच्या शासकीय निवासस्थानी मराठा आंदोलकांनी ठिय्या दिला. यावेळी आंदोलकांनी आपल्या डोक्यावर भगव्या टोप्या घातल्या होत्या, तसंच बंगल्याच्या आत मोठ्या हॉलमध्ये जमिनीवरच त्यांनी बैठक मारली.

यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी देखील इथं उपस्थित होते. मराठा आंदोलकांच्या गराड्यामध्ये सोफ्यावर बसून विखे यावेळी त्याचं म्हणणं ऐकून घेत होते. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजीही केली. या सर्व गर्दीमध्ये आणि गोंधळाच्या वातावरणात विखे काहीसे गोंधळलेले दिसत होते.

रमेश केरेंचं म्हणणं काय?

मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड यांनी दहा दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये जे आंदोलन सुरु होतं त्याठिकाणाहून त्यांनी एक जीआर काढला हा जीआर फसवा आहे. कारण १९६७ च्या आधीच्या ज्या मराठा बांधवांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे.

माझं कुणबी नोंद नाही मग मला ते मिळणार आहे का? पण मराठा समाजात असा गैरसमज निर्माण झालेला आहे की, हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे पण असं आजिबात होणार नाही. त्यामुळं सरकारनं यात नवीन काहीही केलेलं नाही.

मराठ्यांना ओबीसींच्या सवलती मिळणार नाहीत

सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रसाद लाड यांच्यामार्फत एक पोस्ट शेअर केली जात आहे त्यानुसार, जे ओबीसींना ते मराठ्यांना मिळणार आहे. पण असं आजिबात होणार नाही. कारण ज्यांच्या कुणबी अशा जुन्या नोंदी आहेत तर त्यांनाच हा ओबीसींचा फायदा मिळणार आहे.

मनोज जरांगे काय म्हणत आहेत की ज्या ५८ लाख मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्यांना तात्काळ या सरकारनं प्रमाणपत्राचं वाटप करावं. या नोंदी जुन्याच आहेत नव्या नाहीत, पण अनेकांच्या नोंदीच सापडत नाहीएत मग त्यांना याचा फायदा मिळणारच नाही का? असा सवाल या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या रमेश कोरे यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT