Trump warns Israel over Iran attack: "इस्रायलयने काय करतोय याचं भान ठेवावं, अन्यथा इराणविरुद्धच्या युद्धात एकटे पडाल", असा गंभीर इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दिला आहे.
त्यामुळे ट्रम्प यांची इराण आणि इस्रायलमधील संघर्ष थांबवण्याची इच्छा आहे पण इस्रायलकडून त्यांच्या इच्छेविरूद्ध वाटचाल सुरू असल्याचं दिसत आहे. इस्रायलची हीच आठमुठी भूमिका आता ट्रम्प यांना खटकत असल्याने त्यांनी पुन्हा एकदा फोन करत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना हल्ले थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिवाय आता त्यांनी हल्ले थांबवले नाहीत, तर इस्रायलला एकटं पाडण्याचा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला आहे. एकीकडे येत्या दोन आठवड्यांत अमेरिका इराणवर पूर्ण विजयाची घोषणा करेल, असा अंदाज ट्रम्प यांनी बांधला असतानाच तिकडे इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष वाढल्यामुळे अमेरिका-तेहरान शांतता करार धोक्यात आला आहे.
त्यामुळे ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना, "जर इस्रायलने इराणविरुद्धचे युद्ध पुन्हा सुरू केले, तर त्यांना एकट्याने लढावे लागू शकते." असा इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. 'ॲक्सिओस'ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी सांगितलं की, रविवारच्या हल्ल्यांबाबत इस्रायलने आम्हाला खूप उशिरा माहिती दिली. इस्रायल हल्ला करण्यासाठी आधीच निघाला होता. पण त्यांचा तो हल्ला मर्यादित ठेवण्यास मी भाग पाडल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
अशातच आता रविवारी संध्याकाळी ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना फोन करत इराणवर प्रतिहल्ला न करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांत इराणसोबत असा करार होईल, ज्यामुळे हल्ल्यांची गरजच भासणार नाही, असंही म्हटलं आहे. मात्र, त्यानंतरही नेतान्याहू यांनी इस्रायल 'जेव्हा आवश्यक असेल तेव्हा' हल्ला करणे सुरूच ठेवेल असं ट्रम्प यांना सांगितलं आहे.
शिवाय 'जर इराणने पुन्हा आमच्यावर हल्ला करण्याची चूक केली, तर आम्ही बळाचा वापर करून प्रत्युत्तर देऊ, असंही नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता आगामी काळात इस्रायलने इराणवर हल्ले केल्यास ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.