Manoj Jarange 
मुंबई

Maratha Andolan: जिकडे तिकडे भगवं वादळ! मराठा आंदोलकांच्या एन्ट्रीनं 'मुंबईचं' जनजीवन विस्कळीत

Maratha Andolan: मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येनं मुंबईत दाखल झाले आहेत.

Amit Ujagare

Maratha Andolan: मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येनं मुंबईत दाखल झाले आहेत. हातात भगवे झेंडे घेऊन जिकडं बघावं तिकडं मुंबईत सगळीकडं मराठा आंदोलक दिसत आहेत. त्यामुळं मुंबईत जणू एक भगवं वादळं आल्याचा भास निर्माण होत आहे. पण यामुळं सामान्य मुंबईकरांचं जनजीवन मात्र विस्कळीत झालं आहे. अनेक लोकल गाड्या उशीरानं धावत आहेत. तर काही रस्ता मार्ग देखील बंद करण्यात आले आहेत. त्यामुळं वाहतूक कोंडी आणि नागरिकांचा खोळंबा झाला आहे.

मुंबईत कुठे काय?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) परिसरात मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलकांचा जनसागर उसळला आहे. या ठिकाणी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील सुरु केली आहे. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणेनं हा परिसर दुमदुमून गेला आहे. मुंबईत पाऊस सुरु आहे, तरीही देखील या आंदोलकांमधील उत्साह कमी झालेला दिसत नाही. तसंच बृहन्मुंबई महानगर पालिका आणि मंत्रालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर आंदोलकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

त्याचबरोबर ईस्टर्न फ्री वे वर देखील मराठा आंदोलकांच्या गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे. त्यामुळं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्यामुळं इतर मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT