
Amit Shah: बिहारमध्ये इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईवरुन काही स्थानिक नेत्यांनी अपशब्द वापरले. त्यामुळं भाजपनं राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. आता तर खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर प्रहार केला आहे. अमित शहा यांनी शुक्रवारी आसामच्या गुवाहाटीत एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, काँग्रेस आणि त्याचे नेते जितक्या जास्त शिव्या पंतप्रधान मोदींना देतील तितकं जास्त कमळ उमलेलं आणि मोठं होईल.
शहा पुढे म्हणाले, भारतासोबत आपल्या पंतप्रधानांचाही सन्मान वाढला आहे. २७ देशांनी पंतप्रधान मोदींना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवित केलं आहे. हा भारतासाठी गौरवाचा विषय आहे. पंतप्रधानांना संपूर्ण जग सन्मानित करतं. पण भारताच्या राजकारणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे तिरस्कार आणि नकारात्मक राजकारण सुरु केलं आहे. त्याची खालची पातळवरच प्रदर्शन म्हणजे त्यांची घुसखोर बचाव यात्रेमध्ये पाहायला मिळालं.
राहुल गांधींच्या यात्रेला म्हटलं घुसखोर
गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि राजद यांच्या वोटर बचाओ यात्रेला घुसखोर बचाओ यात्रा असं संबोधलं. ही घुसखोर बचाव यात्रा असून त्यांनी बिहारमध्ये काढली आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या स्वागत मंचावरुन नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द बोलून सर्वात घृणास्पद काम काँग्रेसच्या नेत्यांनी केलं आहे. मी याची निंदा करतो. ज्या प्रकारे मुद्द्यांविना राजकारणराहुल गांधींनी सुरु केलं आहे. ती आपल्याला सार्वजनिक जीवनातील उंची देणार नाही, उलट गर्तेत घेऊन जाईल.
मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हापासूनच काँग्रेसचे नेते त्यांच्यासाठी चुकीचे शब्द वापरत होते. पण काँग्रेसनं हे लक्षात ठेवावं की जितक्या जास्त शिव्या तुम्ही पंतप्रधान मोदींना द्याल, कमळाचं फुल तितकं जास्त उमलणार आहे. काँग्रेसनं प्रत्येक निवडणुकीत शिव्या दिल्या आणि तोंडावर पडले. आता ते विजयाला खोटं ठरवण्यासाठी आता घुसखोर बचाओ यात्रा काढत आहेत. जर घुसखोरांनी मतदार यादीत घुसून निवडणुका प्रदुषित करतील, तर कुठलं राज्य कसं सुरक्षित रहील.
दरम्यान, भाजपच्या आरोपांना नाकारताना काँग्रेस पार्टीचे नेता पवन खेडा यांनी म्हटलं की, भाजपनं पहिल्यांदा शिव्या दिल्या, पण आता याच्यावरुन वाद घालत आहेत. भाजपचे एजंट इकडं तिकडे फिरत असतात आणि बदमाशी करतात. ते आता केवळ एक मुद्दा उपस्थित करु इच्छितात. कारण आमच्या यात्रेपासून लक्ष विचलित व्हाव यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांची चोरी आता पकडली गेली आहे. त्यामुळं या लोकांमध्ये खळबळ आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.