Eknath Shinde Meeting On OBC Reservation : Sarkarnama
मुंबई

OBC Reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये; ओबीसी नेत्यांची मागणी ? मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक!

Eknath Shinde Meeting On OBC Reservation : "ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये.."

Chetan Zadpe

Mumbai News : ओबीसी (इतर मागासवर्गीय जाती) आरक्षणाच्या प्रश्नावर आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या कोट्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा ओबीसी आरक्षणावर परिणाम होऊ यासाठी ओबीसी नेते चर्चा करणार आहेत. (Latest Marathi News)

या बैठकीमध्ये ओबीसी नेते बबनराव तायवाडे, माजी आमदार आशिष देशमुख, अशोक जीवतोडे, नरेश बरडे, आमदार परिणय फुके इत्यादी नेते उपस्थित असणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचा ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होऊ नये, अशी भूमिका ओबीसी नेत्यांची आहे. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन केले होते. यामुळे मराठा समाजाला सरसकटपणे कुणबी प्रमाणपत्र देऊन, त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार का? अशी चर्चा होत होती. तशी शक्यताही व्यक्त केली जात होती. यामुळे ओबीसी प्रवर्गाने यासाठी मोठा विरोध दर्शवला. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी आक्रमक भूमिका ओबीसी नेत्यांनी बोलून दाखवली.

मराठा समाजाला अटी शिथिल करून सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर ओबीसी आरक्षणावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असे लेखी आश्वासन सरकारने द्यावे, अशी ओबीसी नेत्यांनी प्रमुख मागणी असल्याचे बोलले जाते.

आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत काही सकारात्मक तोडगा निघाल्यास, ओबीसी नेत्यांचे समाधान झाल्यास राज्यभरातील ठिकठिकाणी सुरू असलेले ओबीसींचे आंदोलन मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT