Maratha Kranti Morcha Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation News : मुंबईत मराठ्यांचा गनिमी कावा! 'मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या...'

Maratha Kranti Morcha Protest : मराठ्यांचा मोर्चातील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गिरगाव ते मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात राज्यभरातील मराठा आंदोलकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

या मोर्चास परवानगी नाही, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मात्र, गनिमी काव्याने आंदोलक वर्षा बंगल्यावर जातील, असे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. (Latest Political News)

मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. परवानगी नसली तरी पोलिसांनी आंदोलकांना गिरगाव येथील शहीद तुकाराम ओंबळे चौक ते व्हिविंग डेकपर्यंत मोर्चाची परवानगी दिली होती.

यात मात्र मोठ्या संख्येने मराठा समाजाच्या आंदोलकांनी सहभाग झाले होते. यातून सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात आल्याने पोलिसांनी मोर्चा रोखला. या वेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांना सात-आठ वाहनांतून पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच गनिमी काव्याने आंदोलक वर्षा बंगल्यावर जातील, असाही इशारा दिला. त्यामुळे पोलिस यंत्रणेवरील ताण वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

तसेच सुरक्षेसाठी वर्षा बंगला परिसरातही चोख बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती आहे. राज्यभरातील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे लक्ष आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र (ओबीसी) मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या विनंतीनुसार त्यांनी १७ दिवसांनंतर आपले उपोषण स्थगित केले.

आरक्षणासाठी जरांगे पाटलांच्या वतीने समाजाने सरकारला ४० दिवसांची मुदत दिली आहे. यातच मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोपर्यंत मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत मराठा समाजात दोन प्रवाह आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT