Shiv Sena MLA Disqualification : आमदार अपात्रतेच्या सुनावणीनंतर अध्यक्ष नार्वेकर तातडीने दिल्लीला जाणार; काय आहे कारण ?

Maharashtra Political News : अचानक सुनावणी वेळापत्रकात बदल...
Shiv Sena MLA Disqualification
Shiv Sena MLA DisqualificationSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजच (ता. १२ ऑक्टोबर) पार पडणार आहे. आज होणारी सुनावणी शुक्रवारी अपेक्षित होती. परंतु अध्यक्षांच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यामुळे ही सुनावणी एक दिवस आधी म्हणजे आज घेण्याचे निश्चित झाले आहे.

मात्र, आज आमदार अपात्रतेवर सुनावणीनंतर नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. नार्वेकरांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)

Shiv Sena MLA Disqualification
16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर बघा काय म्हणाले राहुल नार्वेकर ? | Rahul Narwekar

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी आज होणं अपेक्षित आहे. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी याबाबतचा प्राथमिक निकाल अपेक्षित आहे. आमदारांच्या ज्या याचिका आहेत, त्यावर स्वतंत्र सुनावणी घ्यायची की, एका वेळी एका गटाचं मत आणि दुसऱ्यावेळी दुसऱ्या गटाचं मत ऐकून घेतलं जावं, यावर विचार सुरू आहे. यावर शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटांची मते वेगवेगळी आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचं मत आहे की, प्रकरण एकच असल्याने सर्व आमदारांच्या एकगठ्ठा याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यावी, तर शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की, प्रत्येक आमदाराच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घ्यावी. त्यामुळे अध्यक्षांपुढे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद याच मुद्द्यावर होणार आहे.

Shiv Sena MLA Disqualification
Vasant More News : वसंत मोरेंच्या मनातील इच्छा पूर्ण होणार ? भाजप खासदार उदयनराजेंच्या फोनने चर्चा...

दरम्यान, आजच्या सुनावणीनंतर अध्यक्ष नार्वेकर दिल्लीला जाणार आहेत. मागील वेळीही नार्वेकर दिल्लीला गेले होते. नार्वेकर हे कायदे तज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते, असे सांगण्यात आले. यापूर्वीच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात नार्वेकर म्हणाले होते, 'दिल्लीचा हा माझा पूर्वनियोजित दौरा आहे. अनेक कार्यक्रम आणि बैठका आहेत, त्यात मला सहभागी व्हायचे आहे."

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com