Maratha Reservation Latest News : हिंगोलीत ओबीसी आरक्षण रक्षणासाठी मोठा मेळावा झाला. या मेळाव्यात मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवरच हल्लाबोल केला. मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेली जस्टिस शिंदे समिती बरखास्त करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. याशिवाय जे कुणबी दाखले देण्यात येत आहेत तेही रद्द करा, अशी मागणीही भुजबळांनी केली. पुण्यात आज पत्रकार परिषद घेत भुजबळांनी या मागणीचा पुनरुच्चार केला.
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारलाच घेरले आहे. मराठवाड्यातील निजामकाळातील कुणबी नोंदी शोधण्याची जबाबदारी शिंदे समितीला दिली होती. त्यांनी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हे काम केलेच कसे, असा सवाल भुजबळांनी केला. छगन भुजबळ यांनी घेतेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी माहिती दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांची भुजबळांशी चर्चा
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. ओबीसीतून देऊ नये, या मागणीचा पुनरुच्चार छगन भुजबळ यांनी केला आहे. आता भुजबळांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. छगन भुजबळ यांच्यासोबत आपली चर्चा झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
भुजबळांशी माझी चर्चा झाली आहे. त्यांचा मराठा समाजाला कुठेही विरोध नाही. या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही. ओबीसींचे आरक्षण कमी होता कामा नये, हीच भुजबळांची मागणी आहे. तीच भूमिका सरकारची आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, पवारांसह अनेकांना घेतले शिंगावर!
छगन भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज आणि मातब्बरांशी पंगा घेतला आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या संरक्षणावर भुजबळ आक्रमक आहेत. मुख्यमंत्र्यांनी नेमलेली शिंदे समिती रद्द करा, अशी जाहीर मागणी करत भुजबळांनी आपल्याच सरकारला आव्हान दिले आहे. गृहखात्यावरही त्यांनी टीका केली. एकूणच छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील या सर्वांना शिंगावर घेतले आहे. जरांगे हे आंदोलनातून मराठा समाजाचे नेते झालेत तसे भुजबळही आता ओबीसींचे नेते झाल्याचे चित्र आहे. छगन भुजबळांना यातून नेमके काय साधायचे आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.