Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, नेमके काय झाले ?

Maratha Political News : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर जरांगेंची उर्वरित राज्याच्या दौऱ्यावर जाण्याची तयारी...
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांची प्रकृती पुन्हा खालावल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोन-तीन दिवस उपचाराची आणि आरामाची गरज असल्याचे नियमित तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यात मनोज जरांगेंचा दुसरा दौरा नुकताच पार पडला. आता ते आंदोलनाच्या मूळ अंतरवाली सराटी येथेही दाखल झाले होते. दौऱ्यानंतर त्यांची नियमित तपासणी करण्यात आली. या वेळी जरांगेंना अशक्तपणा असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांना काही दिवस आरामाची आणि उपचाराची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार जरांगे पाटलांवर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉ. विनोद चवरेंनी सांगितले.

Manoj Jarange
Rahul Narwekar : बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसते; नार्वेकरांचा आदित्य ठाकरेंना टोला

दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी दोन टप्प्यांत उपोषण केले होते. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाल्याचेही तपासणीत पुढे आले आहे. पहिल्या १७ दिवसांच्या उपोषणानंतर जरांगेवर दीर्घ उपचार करण्यात आले होते. त्यानंतर बरे झाल्यानंतर त्यांनी राज्याचा पहिला दौरा केला. मात्र, दिलेल्या मुदतीत सरकारने निर्णय घेतला नसल्याने पुन्हा नऊ दिवसांचे उपोषण केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसऱ्या उपोषणानंतर जरांगे पाटलांना बोलतानाही त्रास होत होता. त्यांचे वजन खूप कमी झाले होते. तसेच किडनी आणि लिव्हरवर सूज आली होती. त्यावेळी डॉ. चवरेंनी त्यांना आरामाचा सल्ला दिला होता. मात्र, उपचारानंतर जरांगेंनी पुन्हा राज्याचा दौरा केला. आता ते राज्यातील राहिलेल्या भागात जाणार आहेत. तत्पूर्वीच केलेल्या तपासणीत त्यांना अशक्तपणा जाणवला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर दोन-तीन दिवस उपचार करण्यात येणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange
Maratha Reservation : पाचशे जणांवर गुन्हे, फक्त ऋषिकेश बेदरेलाच का अटक ? मराठा समाज रस्त्यावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com