Manoj Jarange Patil  Sarkarnama
मुंबई

Breaking News : जरांगे-पाटील कोणती भूमिका घेणार? दुपारी 2 वाजता पुन्हा जाहीर सभा

Maratha Reservation : साऊंड सिस्टीमने दगा दिल्यामुळे जरांगे-पाटील यांनी आंदोलनाची भूमिका स्प्ट करण्यासाठी दुपारी 2 ची वेळ दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Manoj Jarange Patil News :

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं काय होणार याची उत्कंठा वाढलेली असतानाच ऐन मोक्याच्या क्षणी साऊंड सिस्टीमने दगा दिला आणि मनोज जरांगे-पाटील यांनी दुपारी 2 वाजता जीआरचे वाचन करू, अशी घोषणा केली. ही घोषणा त्यांनी 12 वाजून 55 मिनिटांनी केली.

मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील नवी मुंबईच्या वाशीतील शिवाजी चौकात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यासाठी त्यांनी साडेबारा वाजता माईक हातात घेतला खरा पण साऊंड सिस्टीम व्यवस्थित काम करत नव्हती. शिवाय आंदोलकांना शांत करण्याचं त्यांचं काम सुरू होतं. अखेर त्यांचा आवाज मराठा आंदोलकांपर्यंत जात नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुपारी 2 वाजता जाहीर सभा घेऊन सरकारचा जीआर वाचून दाखवतील, असं जाहीर केलं.

त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाबाबत सरकारनं नवीन कोणती आश्वासने दिली, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. (Maratha Reservation)

दरम्यान, सकाळी जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही जरांगे-पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. कुठल्याही स्थितीत जरांगे-पाटील यांना मुंबईत येण्यापासून सरकारला रोखायचे आहे. त्यामुळे जरांगे-पाटील कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. (Maratha Aarakshan)

सविस्तर बातमी लवकरच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT