Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation Breaking News : जरांगेंच्या मागण्या मान्य? 3 जीआर घेऊन सरकारचं शिष्टमंडळ निघालं, पण...

Avinash Chandane

Manoj Jarange Patil Update :

मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील यांची आरक्षण पदयात्रा सध्या खंडाळ्याच्या पुढे आहे. जरांगे यांची भेट घेण्यासाठी सरकारचे तीन सदस्यांचे शिष्टमंडळ या अगोदरच रवाना झाले आहे. सध्या सरकारचे शिष्टमंडळ खालापूरमध्ये आहे. त्यांच्याकडे तीन नवे जीआर आणि राजपत्र आहे. त्यामुळे मुंबईत येण्यापूर्वीच जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्याची चर्चा आहे.

या शिष्टमंडळात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, ओएसडी मंगेश चिवटे आणि सरकारी अधिकारी सुनील अवताडे यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ थोड्याच वेळात जरांगे-पाटील यांची खालापूरमध्ये भेट घेईल, असे सांगण्यात येते.

मनोज जरांगे (Manoj Jarange) हजारो मराठा समाज बांधवांसोबत मुंबईच्या दिशेने येत आहेत. काल त्यांचा मुक्काम लोणावळ्यात होता. आज ते लोणावळ्यातून निघाल्यानंतर खंडाळ्यापर्यंत आले असता त्यांना भेटण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ रवाना झाले आहे. जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाची आज बैठक होणार नसल्याची माहिती आहे. ही बैठक शुक्रवारी (ता.25) होईल. त्यानंतर वाशी येथील सभेत निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती

जरांगे-पाटील यांना मुंबईत येऊ न देण्याचा सरकारचा प्लान आहे. तत्पूर्वी मराठा (Maratha Reservation) आंदोलनासाछी शिवाजी पार्क आणि आझाद मैदानासाठी परवानगी मागितली होती. पण या दोन्ही मैदानांसाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जरांगे-पाटील यांच्यासोबत असलेल्या आंदोलकांची संख्या पाहता आझाद मैदान अपुरे आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी शिवाजी पार्क दोन दिवस उपलब्ध करता येणार नाही. त्याऐवजी मुंबई पोलिसांनी जरांगे-पाटील यांना नवी मुंबईच्या खारघरमधील मैदान सुचवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे आणि इतर अधिकाऱ्यांनी दुपारी लोणावळ्यात जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली होती. एक्स्प्रेस-वेऐवजी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने नवी मुंबईत येण्याची विनंती केली. ही विनंती जरांगे-पाटील यांनी मान्य केल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

एक्स्प्रेस-वेवरील नियमित प्रचंड वाहतूक, शिवाय कळंबोली, नवी मुंबई परिसरातील रुग्णालयांमधील वर्दळ लक्षात घेऊन जरांगे-पाटील यांना मार्ग बदलण्याची विनंती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT