Maratha Reservation  Sarkarnama
मुंबई

OBC Morcha: मुंबईत आंदोलनासाठी ओबीसी जनमोर्चानेही मागितली परवानगी; सरकार काय भूमिका घेणार ?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे-पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करणार आहेत.

Ganesh Thombare

Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको करण्यात आले. यानंतर आता मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे-पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करणार आहेत. मुंबईकडे जाण्याचा मार्गही मनोज जरांगे यांनी जाहीर केला आहे.

आता याचवेळी ओबीसी समाजही आपल्या मांगण्यासाठी आक्रमक झाला असून 20 जानेवारीला मुंबईत ओबीसी मोर्चासाठी मुंबई पोलिसांकडे ओबीसी जनमोर्चाने परवानगी मागितली आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मात्र, यावर राज्य सरकार काय भूमिका घेतं, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केलेली आहे. त्यांच्या मागणीनंतर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. मात्र, सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आता मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या आंदोलनासाठी जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मैदानाची पाहणी करत आंदोलनाचे नियोजन केले आहे. मात्र, 20 जानेवारीलाच ओबीसी जनमोर्चानेही आंदोलनाची परवानगी मागत ओबीसींच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची ठाम भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. पण यावर राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ओबीसी जनमोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी यावर भाष्य करत ओबीसी समाजाने देखील आपल्या मागण्यांसाठी 20 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT