Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : '...यामुळे OBC किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही' ; एकनाथ शिंदेंचं वक्तव्य!

Pankaj Rodekar

Thane News : 'मागील अनेक वर्षांपासून सोयी-सुविधांपासून वंचित असलेला मराठा समाजाला आता न्याय मिळाला आहे. तो दिवंगत आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी, यामुळे ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. तसेच मराठा समाज सवलतीपासून आतापर्यंत वंचित होता. त्यांना न्याय देण्याचे निर्णय घेण्याचे काम आपल्या सरकाराने केले, याचा मला अभिमान आहे.' असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केले.

दरम्यान महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या सर्व प्रस्तावित योजनांमध्ये सबसिडी योजना आहे. त्याला 'धर्मवीर श्री आनंद दिघे लाभ समर्पण योजना' असे नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा केल्याचेही शिंदे यांनी यावेळी केली. (CM Eknath Shinde on Maratha Reservation)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी ठाणे येथील खारकर आळी भागातील आनंद दिघे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना, त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, संजय शिरसाट, आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार मिलिंद देवरा(Milind Deora), माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आदी उपस्थित होते.

याप्रसंगी 'दिघे यांची जयंती आपण विविध उपक्रमांनी साजरा करतो. समाजास उपयुक्त असे लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित करतो. दिघे यांनी आपल्याला जी काही शिकवण दिली आहे, त्या आदर्श मार्गाने आपण ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात काम करीत आहोत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आपल्या पाठीशी आशीर्वाद आहेत. त्यामुळेच आनंद दिघे यांच्या जयंती दिवशी आपण मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे.' असे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde)म्हणाले.

याचबरोबर आनंद दिघे यांनी समाजाची सेवा करताना त्यागी वृत्तीने काम केले. सर्व समाजाला आपले कुटुंब मानून त्यांनी काम केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. गोरगरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना दिघे यांची होती. त्यांच्या दरबारात समस्या घेऊन येणारा हसतमुखाने परत जात होता. म्हणूनच त्यांच्या नावाची योजना सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तसेच जे आर्थिक दृष्ट्या खूप श्रीमंत आहे आणि गोरगरिबांना ज्याची आवश्यकता आहे, अशा प्रकारच्या लाभाची योजना समर्पित करण्यासाठी ही योजना आहे. दिघे यांनी आपले जीवन संपुर्णपणे लोकसेवा आणि समाजसेवेसाठी समर्पित केले. त्यामुळेच राज्य सरकारने त्यांच्या नावाने ही योजना सुरू केली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT