Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation: एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Maratha Reservation | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी या संस्थांना सक्षम करण्यास प्राधान्य देणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यात राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या. यात परीक्षेत मराठा आरक्षण (Maratha Reservation) घेऊन निवडसूचीत असलेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार आहे. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या नियुक्तीत साधारणपणे २ हजार १८५ उमेदवार मराठा आरक्षण घेऊन राज्य सरकारच्या सेवेत रुजू होतील. यापैकी ४१९ उमेदवार शासन सेवेत रुजू झाले असून उर्वरीत १ हजार ०६४ उमेदवारांना विविध विभागांमध्ये तत्काळ रुजू करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल, तसेच, या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीने काढण्यात येणार असून ७०२ उमेदवारांना नियुक्ती करण्यासठी संबंधित विभागातील जिल्हाधिकारी आणि विभागांमार्फत विशेष मोहीम घेण्यात येईल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

इतकेच नव्हे तर मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात येणारी उपसमिती आरक्षणासंदर्भात येणाऱ्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी या संस्थांना सक्षम करण्यास प्राधान्य देण्यात येईल. असही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. तर राज्य सरकारमार्फत सारथी संस्थेला दिला जाणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

मराठा आरक्षणांसंदर्भात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या विविध संघटना आणि मराठा समन्वयक उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT