Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी सोमवारी झालेल्या सुनावणीत मुंबई कोर्टाने मराठा आंदोलकांना मुंबई बाहेर ठाण्यातच थांबवा त्यांना मुंबईत येऊ देऊ नका, असे म्हटले होते. त्याची अंमलबजावणी देखील सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी आज बोलताना मुंबईत येण्याच्या गनिमी कावा मराठा आंदोलकांना सांगितला.
'मला कळंतय की मुंबईच्या वेशीवर येत आहेत. पण त्यांना येऊ देत नाही. मराठ्यांचे पोरं येवढे चतुर आहेत. कोणत्याना कोणत्या मार्गाने ते तुम्हाला मुंबईला दिसतील. शनिवार-रविवारच्या नंतर इतके दिसतील की सरकारला ते नेमके मुंबईकर आहेत की मराठ्यांचे हे काहीच ओळखायला येणार नाही.', असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
'सोमवारच्या नंतर आंदोलन हे चालले तर ते आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीमुळे चाललेलं आंदोलन असेल. आणि ते 'छान' असेलच, असा सूचक इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला. मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण मुंबई सोडणार नसल्याचे देखील त्यांनी ठणकावून सांगितले.
सरकराने आमच्याविरोधात न्यायालयात जाऊन कितीही अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सांगतो मुंबई सोडणार नाही. पोलिसांनाही सांगतो सगळ्या मागण्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. मराठा आणि कुणबी हा एकच आहे. या जीआर शिवाय मुंबई सोडणार नाही. सगेसोयरेच्या अंमलबजवणीला, मराठा-कुणबीला काय अडचण काय आहे ते सांगा, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.