Maratha Protest Mumbai : आझाद मैदानावर चिखल होतो, संजय राऊतांनी सूचवलं वेगळं मैदान ; म्हणे तिथे दारू पिण्याशिवाय..

Sanjay Raut statement On Maratha Protest : आझाद मैदानावर मराठा बांधवांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. आता उबाठा खासदार संजय राऊत यांनी या आंदोलनासाठी वेगळी जागा सूचवली आहे.
Sanjay Raut statement On Maratha Protest
Sanjay Raut statement On Maratha ProtestSarkarnama
Published on
Updated on

Maratha reservation agitation : आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. जरांगे यांच्या सोबत हजारो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आझाद मैदानावर अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आझाद मैदान सोडावं अशी नोटीस आता जरांगे पाटील यांना पाठवली आहे. या दरम्यान आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आंदोलकांसाठी नवीन जागा सूचवली आहे.

संजय राऊत म्हणाले, आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. अशी एक सूचना आलेली आहे की, मला वाटतं बाळा नांदगावकर यांच्याकडून ती सूचना आली आहे. की आंदोलकांसाठी वानखेडे स्टेडीयम वर जागा द्या. पण वानखेडे स्टेडियम हे अॅक्टीव आहे. तिथे क्रिकेटचे सामने होतात. म्यझियम उभारले आहेत. सचिन तेंडुलकर, शरद पवार, सुनिल गावस्कर यांचे पुतळे उभारले. सातत्याने तिथे कार्यक्रम होतात. त्यापेक्षा मुंबईत ज्या मैदानावर सध्या क्रिकेटचे सामने होत नाही आणि तिथे फक्त श्रीमंतांचा तो क्लब आहे. ते ब्रेबान स्डेडियम ज्याला आपण CCI क्लब म्हणतो ते मराठा आंदोलकांना आंदोलनासाठी द्यावे असे संजय राऊत यांनी सूचवले आहे.

ब्रेबान स्डेडियम आंदोलकांना देणे अधिक योग्य राहील. कारण आझाद मैदानावर पावसामुळे चिखल होतो. कार्यकर्त्यांना बसता येत नाही. त्यामुळे ते रस्त्यावर येतात. त्यापेक्षा ब्रेबान स्डेडियमला त्यांना जागा देऊ शकलो तर योग्य राहील. हे मी फार गांभीर्याने सांगतोय. कारण त्या मैदानावर क्रिकेटचे सामने होत नाही. ऐकेकाळी व्हायचे. वसंतराव नाईक असताना मराठा माणसाच्या दुष्काळाच्या कार्यक्रमाला त्यांनी जागा नाकारली होती. तिथे आता दारू पिण्याऐवजी दुसरा काही कार्यक्रम होत नाही. त्या क्लबमध्ये मराठा आंदोलकांना जागा द्यायाला हवी असे मला वाटते असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut statement On Maratha Protest
Police Notice Manoj Jarange : मोठी बातमी! आझाद मैदान खाली करा, मनोज जरांगेंना पोलिसांची नोटीस

जबरस्तीने आंदोलकांना हाटवण्याचा प्रयास कोणी करत असेल तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील स्वत:ला मराठा समजणाऱ्या मंत्र्यांना जाब विचावं लागेल. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उपसमितीची जी बैठक झाली, तीचं छायात्रिच तुम्ही पाहिलं असेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्र राजे भोसले त्यांच्या चेहऱ्यावर अजिबताच गांर्भिय नव्हते. हसत हसत काजू बदाम खाताना फोटो आहे. लोक बाहेर उपाशी आहे. अशी टीका राऊतांनी केली.

Sanjay Raut statement On Maratha Protest
Manoj Jarange Patil : पोलिसांची नोटीस : जरांगेंनी दाखवली 'टोपली', म्हणाले मेलो तरी सोडत नाही..

मंत्रिमंडळातीलच काही लोक आंदोलनांच्या आडून राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत. शिवसेना फोडुन देवेंद्र फडणवीसांनी आपल्याच घरात आग लावून घेतली आहे. अमित शाहाच्या पाठींब्याशिवाय हे होऊ शकत नाही. दिल्लीतील फडणवीसांच्या विरोधात भाजपचा एक मोठा गट हे राजकारण करत आहे आणि अमित शहांच्या पाठिंब्याशीवाय हे शक्य नाही, असाही गंभीर आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com