Gunaratna Sadavarte  Sarkarnama
मुंबई

Attack on Gunaratna Sadavarte Vehicle : जरांगेंवर टीका करणाऱ्या सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या; मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अटक

Maratha Kranti Morcha : सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या व्यक्ती 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत होत्या.

Mangesh Mahale

Mumbai Latest News : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज (गुरुवार) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समजते. या प्रकरणी तीन जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर सदावर्तेंनी टीका केली होती. त्यावरून ही तोडफोड केल्याची चर्चा आहे. सदावर्ते यांच्या गाड्यांच्या तोडफोड करणाऱ्या व्यक्ती 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत होत्या.

सुरक्षेसाठी पोलिस तैनात

या प्रकरणी मंगेश साबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. ते फुलंब्री गावाचे सरपंच आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांची गाडी पेटवून दिली होती. सदावर्ते यांची जरांगे पाटलांवर टीका केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी १० ते १५ पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यानंतरही सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोड करण्यात आली.

मराठा आरक्षणाला सुरुवातीपासून सदावर्ते यांनी विरोध केला आहे. त्याबाबत अनेक वेळा टीका केली होती. मराठा आरक्षणाला सरकारने मंजुरी दिली होती. त्यावेळी सुप्रिम कोर्टात सदावर्तेंनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेमुळे हे आरक्षण रद्द झाले होते. मराठा समाजामध्ये सदावर्तेंबाबत तीव्र संताप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT