Ashok Chavan On Maratha Reservation  Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan On Maratha Reservation : सर्वपक्षीयांच्या बैठकीत मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांनी सुचवला फॉर्म्युला !

Ashok Chavan On Maratha Reservation : "राज्याबरोबरच केंद्रीय पातळीवर आरक्षण प्रश्नाबाबत विचार विनिमय व्हावा.."

Chetan Zadpe

Ashok Chavan On Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक पार पडत आहे. या बैठकीत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आरक्षणाबाबत एक मार्ग सुचवल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्यासाठी सांगा असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मत मांडल्याची माहिती मिळत आहे. मराठा आरक्षणप्रश्नावर केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी आग्रही भूमिका चव्हाण यांनी मांडली. यामुळे राज्याबरोबरच केंद्रीय पातळीवर प्रश्नाबाबत विचार विनिमय व्हावा, असा सूर बैठकीतून उमटत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार घेऊन अशी भूमिका मांडली होती. यानंतर आता अशोक चव्हाण यांनी ही भूमिका मांडली आहे. केंद्रावर दबाव पडत नसेल तर ४८ खासदारांनी राजीनामा देवून केंद्रावर दबाव निर्माण केला पाहिजे, असे ठाकरेंनी सुचवले होते. कुठेतरी पंतप्रधानांवर दबाब निर्माण केला आहे, अशी भूमिका केला पाहिजे, असा सूर सर्वपक्षीय बैठकीत उमटत आहे.

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनिल प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, डॉ. प्रशांत इंगळे, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरे, आदी उपस्थित आहेत. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिक, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT