Maratha Reservation News sarkarnama
मुंबई

Maratha Reservation News : एकीकडे सर्वपक्षीयांची बैठक, तर दुसरीकडे सर्वपक्षीय आमदारांनी ठोकले मंत्रालयाला टाळे!

Manoj Jarange Patil Indefinite Hunger Strike : आमदारांकडून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यात आले.

Chetan Zadpe

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडत आहे. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, दुसरीकडे आज दुसऱ्या दिवशीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदारांसह सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन सुरू केले होते.

सर्वपक्षीय आमदारांकडून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यात आले. मंत्रालयाच्या पायऱ्यांवर बसून, हातात फलक घेऊन आमदारांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनात घोषणाबाजी केली आहे. आमदारांकडून चक्क मंत्रालयाला टाळे ठोकले (Latest Marathi News)

या आमदारांनी मंत्रालयाला टाळे ठोकून प्रतिकात्मक आंदोलन केले. मंत्रालयाचं कामकाज आजपासून बंद ठेवू, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आ्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी आमदारांसह सर्वपक्षीय आमदारांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता शिंदे - फडणवीस - पवार सरकारवरील दबाव प्रचंड वाढले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील म्हणाले, "विशेष अधिवेशन बोलवा, मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या. मात्र, सरकारकडून सातत्याने वेळकाढूपणाची भूमिका घेतली जात आहे. यामुळे मराठा समाजाचा उद्रेक होत आहे. हा उद्रेक थांबवायचा असेल तर लवकर आरक्षण घेतले पाहिजे."

मनोज जरांगे पाटलांचा इशारा

'तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण का देत नाही? आरक्षण देण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतील? हे सरकारने स्पष्ट करावं. आरक्षण का देत नाही? हे सांगावं. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन तातडीने बोलवा. त्या अधिवेशनात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करावा. सर्वपक्षीय आमदारांनी आरक्षण घेण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा, रिकाम्या हाताने परत येऊ नये. आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही', असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT