Sharad Pawar, Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Patil Vs BJP : जरांगेंच्या पाठीशी शरद पवार? भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Prasad Lad On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एका जुन्या प्रकरणावरुन अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. याच मुद्द्यावरुन जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं.

सरकारनामा ब्युरो

Maratha Reservation News : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेत सरकारला आणखी एका महिन्याचा कालावधी दिला आहे.

मात्र, जरांगे यांच्या विरोधात एका जुन्या प्रकरणावरुन अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. याच मुद्द्यावरुन जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं. फडणवीसांचा मला मारण्याचा डाव असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.

तर जरांगे यांनी केलेल्या या सर्व आरोपांवर आणि जरांगेंच्या भाषेवर भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. "जरांगे जी भाषा बोलत आहेत, त्यामुळे शरद पवार त्यांच्या पाठीशी असल्याचा वास येत आहे," असा गंभीर आरोप देखील लाड यांनी केला आहे.

प्रसाद लाड जरांगेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना म्हणाले, "आमचे बंधू मनोजदादा यांनी दरेकरांवर शिवराळ भाषेत टीका केली. आज तर त्यांनी सर्व सीमा पार केल्या आहेत. मनोजदादांना सांगू इच्छितो, जर पडायचं आहे तर 288 उमेदवार उभे करा, आम्हीही बघू कसं पाडता. प्रत्येकाचं रक्त लाल असतं, दरेकर मराठा आहे का हे तुम्ही विचारणारे कोण? आम्ही मराठे आहोत का याचं सर्टिफिकेट आम्हाला तुमच्याकडून नको आहे. आम्ही तुमच्या सत्य परिस्थितीवर बोललो तर तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही." अशा शब्दात लाड यांनी जरांगेवर हल्लाबोल केला.

फडणवीसांनी दिलेलं आरक्षण तुम्हाला मान्य नाही का?

फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिलेलं आरक्षण तुम्हाला मान्य नाही का? कोर्टत महाविकास आघाडीने आरक्षण टिकवलं नाही हे मान्य आहे का? तुमच्यावर कुणी गुन्हा दाखल केला तर त्यातही फडणवीसांचा दाखला देत असाल तर ते बोलणं योग्य नाही. त्या प्रकरणाशी फडणवीसांचा संबंध नाही. फडणवीस आणि दरेकरांसाठी वापरलेली भाषा सहन करणार नाही. आमच्यावर संस्कार आहेत, तुम्ही शिव्या देऊनही मी शिव्या दिल्या नाहीत, पण हे तुम्ही सुरूच ठेवाल तर आम्हालाही या भाषेत बोलावं लागेल, असा इशारा लाड यांनी जरांगेंना दिला.

जरांगेंच्या पाठीशी शरद पवार?

तसंच जरांगे यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला, त्यांना महिलांचं चालणारं घर बंद करायचं आहे का? महाविकास आघाडीचे ऐकून तुम्ही हे करताय का? लहान भावाला जर सरकार पैसे देत असेल, दोन कोटी मराठ्यांना याचा फायदा होत असेल तर त्याचा त्रास तुम्हाला आहे का? असे अनेक प्रश्न लाड यांनी जरांगेंना विचारले.

तसंच त्यांनी 288 उमेदवार उभे करावेत, विधिमंडळात येऊन आरक्षणासाठी आमच्या साथीने लढाई करावी. मात्र, जरांगे जी भाषा बोलत आहेत, त्यातून शरद पवार त्यांच्या पाठीशी असल्याचा वास येतोय, असा गंभीर आरोप देखील लाड यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT