Manoj Jarange: मला जेलमध्ये टाकून मारण्याचा फडणवीसांचा डाव? बारा वर्षापूर्वीच्या प्रकरणाचं वॉरंट आताच का निघालं...

Manoj Jarange allegations against Devendra Fadnavis Arrest Warrant: नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Manoj Jarange , Devendra Fadanvis
Manoj Jarange , Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. एका जुन्या प्रकरणावरुन त्यांना हे वॉरंट बजावण्यात आले आहे, त्यांना अटक होणार का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

बारा तेरा वर्षापूर्वीच वॉरंट आताच का निघालं, असा सवाल जरांगे पाटलांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला केला आहे. न्याय आणि ग्रह विभाग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांनी रचललेला हा डाव आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. त्यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. उपोषण स्थगित करताना जरांगे यांनी फडणवीस, आमदार प्रविण दरेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मला जेलमध्ये टाकण्याच फडणवीस यांचा डाव आहे. मी जेलमध्ये जायला घाबरत नाही, असे ते म्हणाले.

जरांगेंनी अंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. जरांगे यांची तब्येत खालावल्याने त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा, सलाईन लावण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर आज उपोषण मागे घेतले असे जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange , Devendra Fadanvis
Jayant Patil Vs Mahendra Gharat: रायगडमध्ये आघाडीत बिघाडी? शेकाप-काँग्रेसमध्ये वाद चिघळणार

जरांगे म्हणाले, "मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही,"

एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणात जरांगे-पाटलांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे.

प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. त्यानंतर ते एकदा कोर्टात हजर झाले होते. मात्र पुढच्या तारखांना ते गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात 2013 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com