Maratha Reservation Hearing Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation Hearing News : मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 26 ऑगस्टला मुंबई हायकोर्टात होणार!

Mayur Ratnaparkhe

Bombay High Court Hearing on Maratha Reservation Update : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाजही शांतता रॅलच्या माध्यमातून राज्यभरात रस्त्यावर उतरला आहे.

या दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबधी सुनावणी पार पडली, मात्र यामध्ये याचिकाकर्त्यांचे आक्षेप कायम राहिले असून, आता पुढील सुनावणी 26 ऑगस्टला होणार आहे.

मराठा आरक्षणाची(Maratha Reservation) पुढील सुनावणी मुंबई हायकोर्टात 26 ऑगस्टला होणार आहे. तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवर याचिकाकर्त्यांनी पुन्हा आक्षेप घेतला आहे. राज्य मागास प्रवर्ग आयोगानं दिलेल्या अहवालावर याचिकाकर्त्यांचे सवाल कायम आहेत. शिक्षणाप्रमाणेच मराठा समाजातील तरूणांना सरकारी नोकरीत आरक्षणाची गरज दाखवणारे आकडे दिशाभूल करणारे असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

'मराठा समाजातील आत्महत्येची आकडेवारी दिशाभूल करणारी आहे. कर्जबाजारीपणामुळे मराठा समाजात आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याचा दावा चुकीचा आहे. आत्महत्येचे वाढीव प्रमाण दाखवून असाधारण परिस्थिती असल्याचा आयोगाच्या अहवालात दिखावा आहे.

तसेच, कुठलेच ठोस आधार नसताना मराठा समाजाला मागास ठरवल्याचा याचिकाकर्त्यांनी केला युक्तिवाद केला आहे. आजची सुनावणी पूर्ण झाली असून याचिकाकर्त्यांनी आणखी युक्तिवादासाठी वेळ देण्याची विनंती केली होती.

अहवालात सादर केलेली आकडेवारी संभ्रम निर्माण करणारी असल्याचा ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रदीप संचेती यांचा दावा आहे. आयोगानं दाखवलेली मराठा समाजाची कमी आकडेवारी आणि टक्केवारी विश्वासार्ह नसल्याचा विरोधकांचा दावा आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्णपीठापुढे सुनावणी पार पडली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT