Sambhaji Raje Chhatrapati News : विधानसभा निवडणुकीत लढायची की नाही याचा निर्णय मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला घेणार आहे. त्यांच्या या निर्णयाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मात्र, 'स्वराज' पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत.
मनोज जरांगे यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही. मात्र, चर्चा होणार नाही हे मी नाकारू शकत नाही. मनोज जरांगे यांचा दृष्टिकोन आणि माझे उदिष्ट एकच आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांच्याशी राजकीय चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत.
संभाजीराजे म्हणाले, शेवटी माझ्या पणजोबांनी शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते घटनेत आणले. मनोज जरांगे पाटील यांना माझ्या नेहमीच पाठींबा राहिला आहे. त्यांच्याशी राजकीय चर्चा झाली नाही मात्र लवकर चर्चा होईल.
लोकसभा निवडणूक 'स्वराज' या आपल्या पक्षाकडून संभाजीराजे छत्रपती हे मराठवाड्यातील मतदारसंघ किंवा कोल्हापूर मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरतील, अशी शक्यता होती. मात्र, कोल्हापूरमधून काँग्रेस संभाजीराजे छत्रपतीचे वडील शाहू छत्रपती यांना तिकीट दिले. त्यानंतर संभाजीराजे हे आपल्या वडिलांच्या प्रचारात व्यग्र झाले. त्यांनी निवडणूक लढली नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी, असे आवाहन भाजप नेते करत आहेत. तर, मंत्री छगन भुजबळ यांनी देखील जरांगे पाटलांनी 288 नाही तर 88 मतदरासंघात आमदार उभे करावे, असे चॅलेंज दिले होते. त्यामुळे मनोज जरांगे काय निर्णय घेतात याची उत्सुकता सगळ्यांचा पक्षांना आहे. 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथील बैठकीत जरांगे आपला निर्णय जाहीर करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.