Maratha Reservation Protest Sarkarnama
मुंबई

Maratha Andolan : आरक्षणासाठी मराठा समाजाच्या संतापाचा भडका; राज्यभरात अलर्ट राहण्याचे पोलिसांना आदेश

Police On Alert In Maharashtra Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. बीडमधील जाळपोळीच्या घटनेनंतर राज्यात पोलिसांना सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

Sachin Fulpagare

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणावरून राज्यात जाळपोळीच्या घटना घडत आहेत. राज्यातील अनेक भागातील एसटी सेवा बंद आहे. बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बीडमध्ये कालपासून १०० हून अधिक एसटी बसेसेची तोडफोड करण्यात आली आहे.

संभाजीनगरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मराठा संघाटनांच्या आंदोलनाचा भडका उडाल्याने पोलीस महासंचालकांनी राज्यभर पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारी कार्यालयं, नेत्यांच्या बंगल्यांवर लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मराठा संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस महासंचालकांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रात्री एक महत्त्वाची बैठक झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत ही बैठकीत झाली. या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील आणि शहरातील परिस्थितीचा आाढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला.

बीडमध्ये जी घटना घडली आणि बसेस पेटवण्यात आल्या या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. नेत्यांची आणि मंत्र्यांची स्थानिक घरं आहेत त्या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पण ज्या ठिकाणी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे, त्या जालन्यासह बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या. हायवेवरील हॉटेल्सही जाळण्यात आली आहेत.

यामुळे स्थानिक पातळीवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंदोबस्तासाठी राज्य राखील पोलीस दलाचाही अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून वापर करावा, अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. रात्रीच्या बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT