Maratha Agitation : आता श्रीमंत शाहू महाराज छत्रपती घेणार मनोज जरांगे पाटील यांची भेट!

Shrimant Shahu Maharaj Chhatrapati : खासदार उदयनराजे आणि माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी भेट या अगोदर जरांगेंची भेट घेतलेली आहे.
Shahu Maharaj Chhatrapati
Shahu Maharaj ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर-

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना राज्यभरातून अनेक नेते आंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेत आहेत. छत्रपती घराण्यातील खासदार उदयनराजे आणि माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी भेट घेतल्यानंतर आता कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज हे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shahu Maharaj Chhatrapati
Curfew in Beed : बीडमध्ये 'SRPF' तुकड्या दाखल; जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह अधिकारी उतरले रस्त्यावर!

मनोज जरांगे रंगे पाटील यांना भेटण्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर व सकल मराठा समाज समन्वयक दसरा चौक कोल्हापूर हे उद्या (मंगळवारी) सकाळी पाच वाजता पॅलेस नवीन राजवाडा येथून अंतरवाली सराटी येथे भेटण्यासाठी रवाना होणार आहेत.

त्यांच्यासोबत सकल मराठा समाजाचे अ‍ॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, बाबा पार्टे, चंद्रकांत पाटील असणार आहेत.

कोल्हापुरातील सकल मराठा समाजाकडून आवाहन -

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती की, सोशल मीडियामध्ये महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अशा मेसेज समाज माध्यमातून फिरत आहे. ही अफवा असून कोल्हापूर बंद बाबत सकल मराठा समाजाने कोणताही निर्णय घेतला नाही.

Shahu Maharaj Chhatrapati
Beed Aandolan : पोलिस माजलगावला अडकले अन् धोका बीडमध्ये ; नेमकं काय घडलं ?

जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही संदेश अथवा मेसेज आपल्यापुढे येत नाही. तोपर्यंत कोल्हापुरात कोणत्याही प्रकारचा महाराष्ट्र बंद अथवा कोल्हापूर बंद होणार नाही. तरी कृपया याची नोंद घ्यावी. पण दसरा चौक येथे साखळी उपोषणाच आंदोलन हे शांततेने सुरूच राहील . असे आवाहन करण्यात आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com