Prasad Lad Vs Manoj Jarange Sarakarnama
मुंबई

Prasad Lad Vs Manoj Jarange : ''फडणवीसांवर बोलताना जरांगेंनी ...'' प्रसाद लाड यांचा सूचक इशारा!

Devendra Fadanvis : ''लेकरू लेकरू म्हणत त्यांनी राजकीय ढेकरू द्यायला सुरुवात केली आहे.'' असंही लाड म्हणाले आहेत.

कृष्णा जोशी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सध्या मनोज जरांगे हे राज्यभरा सभा घेत आहेत. या सभांमधून ते आक्रमक भूमिका मांडत आहेत आणि सरकारला वेळोवेळी इशारा देत आहेत. प्रामुख्याने त्यांचा रोख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadanvis) दिसून येतो. शिवाय, छगन भुजबळांवरही ते निशाणा साधत असतात. याच पार्श्वभूमीवर आता जरांगेंकडून फडणवीसांवर होणाऱ्या टीकेवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

''मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील यांनी राजकीय भाष्य करू नये आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना अभ्यास करूनच बोलावे.'', असा इशारा प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना लाड म्हणाले, ''जरांगे पाटील यांनी आता राजकीय भाषा करणे ही मोठी चूक आहे. लेकरू लेकरू म्हणत त्यांनी राजकीय ढेकरू द्यायला सुरुवात केली आहे. ज्या माणसाने महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण दिले त्यांच्यावर टीका करू नये.

हे आरक्षण कोणामुळे गेलं हे देखील सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुमचा राजकीय बोलवता धनी कोण आहे हेही आम्हाला माहिती आहे. ज्या पद्धतीने मांजर डोळे मिटून दूध पिते, तरी त्याला जग बघतेच. तसेच आपल्यालाही जग बघत आहे.''

याशिवाय, ''मला राजकारणात यायचं नाही, समाजासाठी काम करायचं आहे, असं तुम्ही सतत म्हणता. पण आम्हालाही आमच्या लेकरांसाठीच काम करायचं आहे. आम्हाला शंभर टक्के सुरक्षित आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण द्यायचे आहे.

त्यासाठी आम्ही सतत तुमच्याबरोबर होतो, मात्र फडणवीसांवर बोलताना त्यांचे कार्य, राज्यासाठीचे त्यांचे योगदान या सर्व गोष्टी लक्षात घ्या, अभ्यास करा आणि नंतर बोला.'', असेही लाड यांनी जरांगे पाटील यांना सुनावले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT