Maratha Reservation : ''मी सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही''

Manoj Jarange News : उमरगा शहरातील सभेत मनोज जरांगेंची आक्रमक भूमिका; भुजबळांवरही साधला आहे निशाणा!
Manoj Jarange
Manoj JarangeSarakarnama

Umarga Manoj Jarange Rally : ''मराठा आरक्षणाबाबत 70 वर्षे  फसवणूक केलेला बॅकलॉग सरकारला भरुन काढायचा आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये सरसकट आरक्षण मिळावे यासाठी आपण लढा तीव्र केला आहे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. मी सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.'', असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

उमरगा शहरातील हुतात्मा स्मृती वाचनालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर पंधरा फूट लांबीचा, सातशे किलो वजनाचा हार सकल मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे यांना घालण्यात आला. तेथून भव्य मिरवणुकीने ७५ जेसीबीतुन फुलांचा वर्षाव करत शिवाजी महाविद्यालयात त्यांचे आगमन करण्यात आले. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जरांगे पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या (कै.) शिवाजीराव मोरे क्रीडा संकुलाच्या भव्य प्रांगणावर रविवारी रात्री नऊ वाजता मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांच्या सभेला प्रारंभ झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange
Shrikant Shinde : ''पाथरीत आता 'खान' अन् 'बाण' दोन्हीपण'' ; श्रीकांत शिंदेंचं विधान!

थंडी, वाऱ्याची पर्वा न करता मराठा समाजातील महिला, पुरुष मोठ्यासंख्येने सभास्थळी उपस्थित होते. प्रारंभी शाहिर संतोष साळूंके यांनी पहाडी आवाजात मराठा आरक्षणासंदर्भात प्रबोधन केले. रविंद्र बनसोड यांनी मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भातील इतिहास मांडला.

या वेळी जरांगे पाटील पुढे म्हणाले की, ''1805 पासून 1967 व आज 2023 पर्यंत आरक्षणाच्या नोंदी सापडल्या आहेत. मग या नोंदी होत्या तर आजपर्यंत झाकून कोणी ठेवल्या होत्या?", असा सवाल त्यांनी सरकारला केला. तसेच, ''ज्या जाती ओबीसीत नाहीत, त्यांची यादी तयार करा, जे सध्या ओबीसीत आहेत, ते ओबीसी म्हणून सिद्ध करा आणि नव्याने ओबीसी जनगणना करावी.'', अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

Manoj Jarange
Smriti Irani : रिकाम्या खुर्च्या पाहून स्मृती इराणींनी घेतला काढता पाय; मंचावर गेल्याच नाहीत

याशिवाय ''1931 मधील ब्रिटिश जनगणना जशाच तशी उचलून नोंदी न घेता सरकारपुढे ठेवण्यात आल्या. त्यानंतर 1990 मध्ये 14 टक्के ओबीसींना याच नोंदीवर आरक्षण देण्यात आले. तर लगेच चार वर्षांनंतर हेच आरक्षण 1994ला 30 टक्क्यांवर कसे काय नेले? मराठ्यांचे आई-वडील रात्रं-दिवस कष्ट करून, पोटाला चिमटा देऊन लेकरांना शिकवितात. मात्र, एक मार्क कमी पडल्यामुळे तो रडत घराकडे येतो. यापेक्षा त्या लेकरांचे आई-वडिलांचे व या जातीचे दुर्दैव काय असू शकते?. खरेतर मराठा व कुणबी ही एकच जात आहे. इतर जातीतील उपजातीना जसे आरक्षण दिले, त्याचप्रमाणे कुणबी मराठा जातीसही सरसकट आरक्षण दिले पाहिजे. ''

याचबरोर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तालुक्यातील माडज येथील 30 वर्षीय तरुण किसन माने यांनी आत्महत्या केली होती. मनोज जरांगे पाटील यांनी माने कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

छगन भुजबळांवर टीकास्त्र -

मराठा आरक्षणाला विरोध करणारे मंत्री छगन भुजबळांवर(Chhagan Bhujbal) जरांगे पाटील यांनी टीकास्त्र सोडले. ''भ्रष्टाचारामुळे गोरगरिबांच्या तळतळाट लागल्याने भूजबळांनी जेलवारी केली आहे, त्यांनी माझ्या शिक्षणावर, अभ्यासावर बोलू नये. मला संविधानाचा अभ्यास आहे. जाती, जातीत गैरसमज करून मराठ्यांचं आरक्षण रोखण्याचं भूजबळांच स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका.'' असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com